ऑस्ट्रेलियाची मालिकेत बरोबरी

मंगळवार, 18 डिसेंबर 2018

वेगवान खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजांसमोर भारताच्या शेपटाला आज (मंगळवार) पाचव्या दिवशी अवघा तासभर तग धरता आला आणि भारताचा दुसरा डाव 140 धावांत संपुष्टात आल्याने भारताला पराभवाला सामोरे जावे लागले

पर्थ : वेगवान खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजांसमोर भारताच्या शेपटाला आज (मंगळवार) पाचव्या दिवशी अवघा तासभर तग धरता आला आणि भारताचा दुसरा डाव 140 धावांत संपुष्टात आल्याने भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे.

दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या सत्रातील महंमद शमीच्या भेदक स्पेलनंतरही दुसऱ्या डावात फलंदाजांना आलेल्या साफ अपयशामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत पराभवाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला होता. आज सकाळी त्याची औपचारिकता पूर्ण झाली. विजयासाठी 287 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव 140 धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी विजय मिळविला. स्टार्क आणि लायनने प्रत्येकी तीन बळी मिळविले. रिषभ पंत 30 धावांवर बाद झाला. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- 

INDvsAUS : भारताचा ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभव; मालिका बरोबरीत 

Web Title: Australia wins the 2nd test by 146 runs