esakal | IND W vs AUS W Day 4 : भारतीय महिलांसमोर गांगरलेल्या कांगारुंचा जिगरबाज निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

IND W vs AUS W : भारतीय महिलांसमोर गांगरलेल्या कांगारुंचा जिगरबाज निर्णय

IND W vs AUS W : भारतीय महिलांसमोर गांगरलेल्या कांगारुंचा जिगरबाज निर्णय

sakal_logo
By
सुशांत जाधव

IND W vs AUS W, Day Night Test Day 4 ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल दाखवली. पूजा वस्त्रारकरच्या 3 विकेट आणि झुलन गोस्वामी, मेगना सिंग आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी 2-2 विकेट घेत ऑस्ट्रेलिया महिला संघाला बॅकफूटवर ठेवले. सामन्यात 136 धावांनी पिछाडीवर असताना ऑस्ट्रेलिया महिला संघाने 9 बाद 241 धावांवर डाव घोषीत केला. पिंक बॉलवरील ऐतिहासिक निकाल निकाल लागावा यादृष्टीने ऑस्ट्रेलियन महिलांनी मोठे पाउलच उचचल्याचे पाहायला मिळाले. कसोटी सामन्यात अवघ्या 71 सामन्याचा खेळ बाकी असल्यामुळे ऑस्ट्रेलियन महिला संघाने पिछाडीवर असूनही डाव घोषीत केला.

भारतीय महिला संघाने पहिल्यांदा फंलदाजी करताना 8 बाद 377 धावांवर डाव घोषीत केला होता. पहिल्या डावात स्मृती मानधनाने 127 धावांची धमाकेदार खेळी केली. तिच्याशिवाय दीप्ती शर्मानेही 66 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन महिला संघाची सुरुवात खराब झाली. सलामीची बॅटर मूनीला झुलन गोस्वामीनं अवघ्या चार धावांवर बोल्ड केले. त्यानंतर हेलीचा खेळ तिने 29 धावांत खल्लास केला.

हेही वाचा: RCB प्लेऑफची जागा पक्की करुन PBKS ला आउट करणार की,...

आघाडीचे बॅटर स्वस्तात माघारी परतल्यानंतर एलिसा पेरीने 203 चेंडूत नाबाद 68 धावांची खेळी केली. गार्डनरने 51 धावा करत तिला बऱ्यापैकी साथ दिली. या दोघींनी पाचव्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली.

हेही वाचा: शूटींग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा गोल्डन धमाका!

भारतीय महिला संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. पहिल्या डावात शतकी खेळी करणारी स्मृती मानधना 48 चेंडूत 31 धावा करुन बाद झाली. मॉलीनेक्सनं गार्डनरकरवी तिला झेलबाद केले. तिची जागा घेण्यासाठी आलेल्या यस्तिका भाटीलायालाही मैदानात तग धरता आला नाही. ती अवघ्या 3 धावांची भर घालून माघारी फिरली. भारतीय महिला संघाने दुसऱ्या डावात 74 धावांवरच दुसरी विकेट गमावली होती. भारतीय संघाने 236 + धावांची आघाडी घेतली असून ऑस्ट्रेलियन महिला संघासमोर भारतीय महिला किती धावांचे लक्ष्य ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

loading image
go to top