esakal | IPL 2021 : RCB प्लेऑफची जागा पक्की करुन PBKS ला आउट करणार की,...
sakal

बोलून बातमी शोधा

KL Rahul And Virat Kohli

RCB प्लेऑफची जागा पक्की करुन PBKS ला आउट करणार की,...

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021, RCB vs PBKS Match Preview :आयपीएलच्या 14 व्या हंगामातील स्पर्धा हळूहळू अखेरच्या टप्प्याकडे सरकत आहे. स्पर्धेतील 48 व्या सामन्यात रविवारी दुपारच्या सत्रात शारजहाच्या मैदानात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) विरुद्ध लोकेश राहुलचा पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात लढत रंगणार आहे. दोन्ही संघ प्ले ऑफमधील आपली जागा मजबूत करण्यासाठी मैदानात उतरतील. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सामन्याला सुरुवात होईल.

आपल्या पहिल्या वहिल्या आयपीएल ट्रॉफीच्या प्रतिक्षेत असलेल्या आरसीबीने 11 पैकी 7 विजय आणि 4 पराभवासह 14 गुणांची कमाई केली आहे. पंजाब विरुद्ध जर त्यांनी विजय नोंदवला तर त्यांचे प्ले ऑफमधील स्थान निश्चित होईल. दुसरीकडे स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याची मोठी कसोटी पंजाब किंग्जसमोर असेल. मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला 5 विकेट्सनी पराभूत करत पंजाब किंग्जने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. त्यांनी 12 सामन्यात 5 विजयासह 10 गुण मिळवले आहेत. उर्वरित दोन्ही सामने जिंकणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. जर बंगळुरु विरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला तर त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येण्याची भिती आहे.

RCB vs PBKS: एकमेकांविरोधातील कामगिरी

यंदाच्या हंगामातच नव्हे तर आयपीएलच्या स्पर्धेत आकडे हे पंजाबच्या बाजूनं आहेत. यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्यात पंजाबने विराट कोहलीच्या बंगळुरु विरुद्ध 34 धावांनी विजय नोंदवला होता. आतापर्यंत आयपीएलमध्ये दोन्ही संघात 27 सामने रंगले होते. यात आरसीबीने 12 तर पंजाबने 15 सामने जिंकले आहेत.

हेही वाचा: शूटींग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचा गोल्डन धमाका!

आकडे जरी पंजाबच्या बाजूनं असले तरी सध्याच्या परिस्थितीत पंजाब किंग्जसमोरील आव्हान सोपे नाही. एकतर त्यांच्यावर स्पर्धेतील आव्हान टिकवण्याचा दबाव असेल. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली मोठी खेळी करण्यात यशस्वी ठरला नसला तरी सलामीवीर पडिक्कल, मॅक्सवेल लयीत दिसत आहेत. श्रीकर भरतही चांगली कामगिरी करताना दिसतोय. मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, शाहबाज अहमद आणि युजवेंद्र चहल उत्तम गोलंदाजी करत असून ते पंजाबच्या संघाला अडचणीत आणू शकतील. पंजाबचा संघाला कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या जोडीकडून मोठ्या अपेक्षा असतील. मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंह डेथ ओव्हरमध्ये कशी कामगिरी कतात हे पाहणे देखील महत्त्वाचे असेल.

हेही वाचा: IPL Points Table : राजस्थानच्या विजयानं प्लेऑफच्या शर्यतीत ट्विस्ट

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: विराट कोहली (कर्णधार), नवदीप सैनी, ग्लेन मॅक्सवेल, डॅन क्रिश्चियन, रजत पाटीदार, दुष्मंत चामीरा, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन बेबी, वानिंदु हसरंगा, जॉर्ज गार्टन, युजवेंद्र चहल, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल , कायले जेमिसन, सुयश प्रभुदेसाई, श्रीकर भरत, टिम डेविड, आकाश दीप और एबी डिविलियर्स.

पंजाब किंग्ज: केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, अर्शदीप सिंह, ईशान पोरेल, शाहरुख खान, मोहम्मद शमी, नाथन एलिस, आदिल राशिद, मुरुगन अश्विन, हरप्रीत बरार, मोइजेस हेनरिक्स, क्रिस जॉर्डन, एडेन मार्करम, मनदीप सिंह, दर्शन नालकांडे, प्रभसिमरन सिंह, रवि बिश्नोई, उत्कर्ष सिंह, फॅबियन एलेन, सौरभ कुमार आणि जलज सक्सेना.

loading image
go to top