esakal | INDvsAUS:टीम इंडियाचे ‘तारे जमीं पर’; फिंच-वॉर्नरसमोर गोलंदाजांचे लोटांगण
sakal

बोलून बातमी शोधा

australia won by 10 wickets first odi against india mumbai 2020

खेळपट्टी फलंदाजीस पोषक, सीमारेषा नेहमीपेक्षा जवळ आणि सर्वांत म्हणजे दवाचा त्रास नाही. तरिही सामन्याचा एकतर्फी निकाल दोन्ही संघातील मानसिकता स्पष्ट करत होता.

INDvsAUS:टीम इंडियाचे ‘तारे जमीं पर’; फिंच-वॉर्नरसमोर गोलंदाजांचे लोटांगण

sakal_logo
By
शैलेश नागवेकर : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दुबळ्या प्रतिस्पर्ध्यांना चारीमुंड्या चीत करायचे आणि ताकदवर योध्यासमोर आपणच स्वतः पांढरे निशाण फडकवत सफशेल शरणागती स्वीकारायची अशी अवस्था विराट कोहलीच्या टीम इंडियाची मुंबईत ऑस्ट्रेलियासमोर झाली. परिणामी तीन सामन्यांच्या मालिकेतला पहिल्याच सामन्यात दारुण हार स्वीकारावी लागली. भारत सर्वबाद 255 आणि ऑस्ट्रेलियाचे शतकवीर ऍरॉन फिंच व डेव्हिड वॉर्नर या दोघांनी नाबाद रहात ही धावसंख्या 37.4 षटकार पार करून भारतींच्या जखमेवर मीठ चोळले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फरक मानसिकतेमधला
खेळपट्टी फलंदाजीस पोषक, सीमारेषा नेहमीपेक्षा जवळ आणि सर्वांत म्हणजे दवाचा त्रास नाही. तरिही सामन्याचा एकतर्फी निकाल दोन्ही संघातील मानसिकता स्पष्ट करत होता. प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळूनही भारतीयांना धावांचा वेग तर वाढवता येत नव्हताच पण 33 व्या षटकापर्यंत प्रमुख पाच फलंदाज गमावले होते. ऑस्ट्रेलियाने 15 षटकांतच शंभरच्या पुढे मजल मारून विजय निश्चित केला होता.

धवनची संथ सुरुवात मुळावर
तत्पूर्वी,  दुपारी प्रथम फलंदाजी मिळालेल्या भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक 74 धावांची खेळी केली, परंतु त्याची 12 चेंडूत एक आणि 20 चेंडूत तीन धावा अशी कमालीची संथ सुरुवात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना अडचणीत आणणारी ठरली. धवन आणि राहुल यांनी भले शतकी भागीदारी केली, पण कोठेही धावगतीचा आलेख उंचावत गेला नाही.

आणखी वाचा - उसळलेल्या तलवारी म्यान, भारतीयांची ऑस्ट्रेलियासमोर शरणागती

विराट कोहलीही अपयशी
शतकी भागीदारीनंतर धवन आणि राहुल 11 चेंडूत बाद झाल्यावर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या विराटचा या क्रमांकावरची सरासरी चांगली आहे. त्याने झाम्पाला षटकार मारून बॅट पारजली खरी परंतु पुढच्याच चेंडूवर तो झाम्पाकडेच झेल देऊन बाद झाला आणि तेथेच भारताचा डाव संकटात आला.

रिषभ पंत जखमी
कमिंसचा उसळता चेंडू पंतच्या बॅटला लागलेचा चेंडू हेल्मेटला लागून उडाला आणि त्यात तो बाद झाला पण जोरदार फटका लागल्यामुळे पंत यष्टीरक्षण करू शकला नाही. राहुलने ही जबाबदारी पार पाडली.

आकडेवारी
वॉर्नरच्या भारताविरुद्ध अखेरच्या चार खेळी

  • 124 (119)
  • 53 (62)
  • 56 (84)
  • 128 (112)

फिन्च-वॉर्नरची भारताविरुदध दुसऱ्यांदा द्विशतकी सलामी

  • 28 सप्टेंबर 2017 : 231 (35 षटके).
  • 14 जानेवारी 2020 : वॉर्नरचे 18 आणि फिन्चचे 16 वे शतक.

संक्षिप्त धावफलक : भारत : 49.1 षटकांत सर्वबाद 255 (रोहित शर्मा 10 - 15 चेडू, 2 चौकार, शिखर धवन 74 -91 चेंडू 9 चौकार, 1 षटकार, केएल राहुल 47 - 61 चेंडू 4, चौकार,  विराट कोहली 16- 14 चेंडू 1 षटका, रिषभ पंत 28 - 33 चेंडू, 2 चौकार,  १ षटकार, रवींद्र जडेजा 25- 32 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार, मिशेल स्टार्क 56-3, पॅट कमिंस 44-2, झाम्पा 53-1, अॅगर 56-1) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया 37.4 षटकांत बिनबाद 258 (अॅरॉन फिन्च नाबाद 110 -114 चेंडू, 13 चौकार, 2 षटकार, डेव्हिड वॉर्नर  नाबाद 128- 112 चेंडू 17 चौकार 3 षटकार)

loading image