
पुरुष एकेरीतील दुसऱ्या क्वार्टरफायनलमध्ये रशियाच्या असलान ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली.
मेलबर्न : टेनिस जगतातील अव्वल मानांकित आणि ऑस्ट्रेलियन ओपनचा विक्रमी आठवेळा जेतेपद पटकावणाऱ्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचने संघर्षमय लढतीत विजय नोंदवत सेमीफायनल गाठली. त्याला जर्मनीच्या अॅलेक्झांडर झ्वेरेव चांगलेच दमवलं. पहिल्या सेट गमावलेल्या जोकोविचन दमदार कमबॅक करत अनुभवाच्या जोरावर अखेर 6-7, 6-2, 6-4, 7-6 अशा फरकाने सामना जिंकत ऑस्ट्रेलिय ओपनमधील आपला प्रवास कायम ठेवला.
झ्वेरेव आणि जोकोविच यांच्यातील सामना तब्बल 3 तास 30 मिनिटे रंगला होता. जोकोविचने पहिला सेट टाय ब्रेकमध्ये गमावला. झ्वेरेवने हा सेट 8-6 असा आपल्या नावे केला. त्यानंतर जोरदार पुनरागमन करत जोकोविचने पुढील दोन से 6-2, 6-4 असे जिंकले. चौथ्य सेटमध्ये दोघांच्यात चांगलीच रंगत झाली. हा सेटही ट्राय ब्रेकमध्ये गेला. अखेर जोकोविचने 8-6 अशी बाजी मारली.
Australian Open 2021 : सेरेना-नाओमी यांच्यात रंगणार सेमीफायनल
पुरुष एकेरीतील दुसऱ्या क्वार्टरफायनलमध्ये रशियाच्या असलान ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. त्याने पदार्पणाच्या ग्रँडस्लॅममध्ये सेमीफायनल गाठली. बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्ह आणि रशियन असलान यांच्यात दुसऱ्या क्वार्टर फायनलची रंगत लढती होती. पहिल्या ग्रँण्डस्लॅम खेळणाऱ्या असलानने पहिला सेट 2-6 असा गमावला. मात्र त्यानंतर जोरदार कमबॅक करत त्याने पुढील तिन्ही सेटमध्ये आपला दबदबा राखला. त्याने हा सामना 2-6, 6-4, 6-1, 6-2 असा जिंकला. पहिल्या सेमीफायनलमध्ये त्याच्यासमोर आता जोकोविचचं तगड आव्हान असणार आहे.