Australian Open 2021 : आपल्याच देशाच्या गड्याला नमवत मेदवेदेवनं गाठली सेमीफायनल

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 17 February 2021

 सेमीफायनलमध्ये त्याला  ग्रीसचा स्टीफानोस त्सित्सिपास आणि राफेल नदाल यांच्यातील विजेत्याशी भिडावे लागेल. 

Australian Open 2021 : रशियाच्या चौथ्या मानांकित डॅनिल मेदवेदेव याने वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आपली आगेकूच कायम ठेवली आहे. दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये त्याने आपल्याच देशातील प्रतिस्पर्धी आंद्रेय रुबलेव्ह याला एकतर्फी मात दिली. मदवेदेव याने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्षस्व दाखवले. पहिला सेट त्याने 6-4 असा आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये तर प्रतिस्पर्धी आंद्रेला केवळ दोन पाँइट्स मिळवण्यात यश मिळाले. तिसऱ्या सेटमध्ये मेदवेदेव याने 6-3 असा खेळ करत सरळ सेटमध्ये आंद्रेचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आणला.  

दुसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत ग्रीसचा स्टीफानोस त्सित्सिपास आणि राफेल नदाल यांच्यात सामना रंगणार आहे. यांच्यातील विजेत्यासोबत डॅनिल मेदवेदेव सेमीफायनलमध्ये टक्कर देईल. पुरुष एकेरीत पहिल्या सेमीफायनलमध्ये नोवाक जोकोविच आणि रशियाचा अस्लान करात्झेव्ह यांच्यात सामना रंगणार आहे. दुसऱ्या क्वार्टर फायनलमधील सामन्यानंतर पुरुष एकेरीतील दुसऱ्या सेमीफायनलचे चित्र स्पष्ट होईल.  

फाफ डुप्लेसीची कसोटीमधून निवृत्ती; कारणही केलं स्पष्ट

महिला एकेरीतील सेमीफायनलचे चित्र स्पष्ट झाले आहे. महिला गटातील पहिल्या सेमीफायनलमध्ये 24 व्या ग्रँडस्लॅमवर नजर ठेवून असणारी अमेरिकन सेरेना ही जपानच्या तिसऱ्या मानांकित नाओमी ओसाकाशी लढताना दिसेल. दुसऱ्या सेमीफायनलमध्ये अमेरिकन जेनिफर  बार्टी आणि कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांच्यात लढत रंगणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australian Open 2021 Medvedev Magnificent Against Rublev Reaches Australian Open Semi Final

टॉपिकस
Topic Tags: