
जोकोविचने पुन्हा एकदा डॅनियल मेदवेदेवचे कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅमचे स्वप्न उद्धवस्त केले.
मेलबर्न : सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि रशियन डेनियल मेदवेदेव यांच्यात रविवारी वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅमसाठी लढत रंगली होती. जागतिक क्रमावरीतील अव्वलस्थानी असलेल्या जोकोविचने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या मेदवेदेवला पराभूत करत नवव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. या जेतेपदासह जोकोविचने 18 व्या ग्रँडस्लमवर नाव कोरले. जोकोविचनं 7-5, 6-2, 6-2 अशा फरकाने मेदवेदेव याला पराभूत केले.
मेलबर्न पार्कच्या कोर्टवर रंगलेल्या सामन्यात जोकोविचने सुरुवातीपासून वर्चस्व राखले. जोकोविचने पुन्हा एकदा डॅनियल मेदवेदेवचे कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅमचे स्वप्न उद्धवस्त केले. पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या खेळाडूंमध्ये रोजर फेडरर आणि राफेल नडाल यांचा समावेश आहे. दोघांनी प्रत्येकी 20-20 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली आहे.
त्यानंतर जोकोविच तिसऱ्या स्थानावर आहे. यापूर्वी मेदवेदेव याला अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये जोकोविचनेच पराभूत केले होते. जोकोविच आणि मेदवेदेव आतापर्यंत 8 वेळा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. यात जोकोविचने 5 तर मदवेदेव याने 3 सामने जिंकले आहेत. भारत भारत भारत भारत