Australian Open 2021 : नदालचा खेळ खल्लास, स्टीफानोसनं गाठली सेमीफायनल

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 17 February 2021

सेमीफायनलमध्ये स्टीफानोसनं याच्यासमोर आता रशियाच्या चौथ्या मानांकित डॅनिल मेदवेदेव याचे आव्हान असणार आहे. 

ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या क्वार्टर फायनलच्या रंगतदार सामन्यात ग्रीसच्या स्टीफानोस त्सित्सिपस याने स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदालला रोखत सेमीफायनल गाठली. स्टीफानोस याने 6-3, 6-2,6-7, 4-6,5-7 अशा फरकाने सामना आपल्या नावे केला. पहिले दोन सेट गमावल्यानंतर स्टीफानोस याने जोरदार कमबॅक करत पुढील तीन सेट दिमाखात जिंकले. सेमीफायनलमध्ये त्याची लढत रशियाच्या चौथ्या मानांकित डॅनिल मेदवेदेव याच्याशी होणार आहे.

Australian Open 2021 : आपल्याच देशाच्या गड्याला नमवत मेदवेदेवनं गाठली सेमीफायनल

यापूर्वी झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये रशियाच्या चौथ्या मानांकित डॅनिल मेदवेदेव याने  आंद्रेय रुबलेव्ह याला एकतर्फी पराभूत करत सेमीफायनलध्ये प्रवेश केलाय. पुरुष एकेरीत पहिल्या सेमीफायनलमध्ये नोवाक जोकोविच आणि रशियाचा अस्लान करात्झेव्ह यांच्यात सामना रंगणार आहे. तर दुसऱ्या सेमीफानलमध्ये ग्रीसच्या स्टीफानोस याचा आता डॅनिल मेदवेदेव याच्यासोबत सामना रंगेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australian Open 2021 Stefanos Tsitsipas beat Rafael Nadal five set thriller Match and Enter Semi Final