Australian Open : फायनलचं कोर्ट सजलं, जोकोविच येणार नदालच्या बरोबरीत?

Australian Open 2023 Novak Djokovic
Australian Open 2023 Novak Djokovic

Australian Open 2023 Novak Djokovic : ज्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत गतवर्षी नोव्हाक जोकोविचला लसीकरणाच्या विषयावरून भाग घेण्यापासून रोखण्यात आले होते. त्याच नोव्हाक जोकोविचने पुढच्याच हंगामात अंतिम फेरी गाठून सर्वांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने अमेरिकेच्या टॉमी पॉलचा 7-5, 6-1, 6-2 असा पराभव करत 10 व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल गाठली आहे. आता जोकोविचला राफेल नदालच्या 22 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. त्याचा सामना आता ग्रीसच्या तिसऱ्या सीडेड त्सित्सिपास सोबत होणार आहे.

Australian Open 2023 Novak Djokovic
IND vs NZ 1st T20I LIVE : नाणेफेक जिंकली! पांड्या रोहितच्या हातावर हात मारणार?

त्सित्सिपासने सेमी फायनलमध्ये रशियाच्या 18 व्या सीडेड कारेन खाचनोव्हचा 7-6(7-2), 6-4, 6-7(6-8), 6-3 असा पराभव केला. दरम्यान, दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात नोव्हाक जोकोविचला आपल्या वडिलांची स्टँडमधील अनुपस्थितीत चांगलीच जाणवली.

Australian Open 2023 Novak Djokovic
R Ashwin : अश्विनने पहिल्याच भेटीत केला पाणउतारा; माजी कोचचा धक्कादायक खुलासा

जोकोविचचे वडील सर्दजान यांना स्टेडियमबाहेर पुतीन यांचा चेहरा असलेला रशियाचा झेंडा घेऊन उभ्या असलेल्या चाहत्यासोबत फोटो काढणे महागात पडले. जोकोविचच्या क्वार्टर फायनलनंतर बुधवारी हा वाद उद्भवला होता. त्यानंतर युक्रेनने जोकोविच यांच्या वडिलांवर स्पर्धेत बंदी घालण्याची मागणी केली.

दरम्यान, सर्दजान यांनी सेमी फायनलपूर्वी एक वक्तव्य प्रसिद्ध केले. त्यांनी सेमी फायनलपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी फक्त शांतता हवी आहे कोणताही अडथळा निर्माण करायचा नाहीये असे सांगितले.

(Sports Latest News)

हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com