David Warner Retirement : अखेर वॉर्नरने सांगितलं कधी होणार निवृत्त; 'या' मालिकेनंतर संपवणार कारकीर्द | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

David Warner Retirement

David Warner Retirement : अखेर वॉर्नरने सांगितलं कधी होणार निवृत्त; 'या' मालिकेनंतर संपवणार कारकीर्द

David Warner Retirement : ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉ्र्नरने आपल्या निवृत्तीबाबत माहिती दिली आहे. डेव्हिड वॉर्नर म्हणाला की तो यंदाच्या ऑस्ट्रेलियच्या उन्हाळी हंगामानंतर कसोटीमधून निवृत्त होईल.

डेव्हिड वॉर्नर सध्या भारताविरूद्धच्या WTC Final साठी इंग्लंडमध्ये तयारी करत आहे. हा सामना 7 जून पासून ओव्हलवर सुरू होत आहे. यानंतर तो इंग्लंडमध्ये होणाऱ्या अॅशेस मालिकेत देखील दिसण्याची शक्यता आहे.

डेव्हिड वॉर्नरने त्याचे प्रमुख लक्ष्य हे भारतात होणारा वनडे वर्ल्डकप असल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलियाचा 36 वर्षाचा डावखुरा सलामीवीर आपली कसोटी कारकीर्द ही मयादेशात जानेवारी महिन्यात पाकिस्तान विरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेनंतर संपवू शकतो. तो आपली शेवटची कसोटी सिडनी विरूद्ध खेळेल.

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या इंग्लंडमधील बेकनहम येथे सराव करत आहे. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना वॉर्नरने आपल्या निवृत्तीचा प्लॅन सांगितला. तो मायदेशातील पाकिस्तानविरूद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर आपली कारकीर्द संपवू शकतो.

डेव्हिड वॉर्नर पत्रकाराला म्हणाला की, 'तुम्हाला धावा कराव्या लागतील. मी कायम सांगत आलोय की 2024 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये मी माझा शेवटचा सामना खेळेन. मी असं ठरवलं आहे की जर मी इथं (WTC Final) धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियात खेळत राहिलो तर मी नक्कीच वेस्ट इंडीज विरूद्धची मालिका खेळणार नाही.'

जर मी WTC Final मध्ये आणि अॅशेस मालिकेत धावा केल्या. जर पाकिस्तान मालिकेपर्यंत खेळू शकलो तर मी नक्कीच त्या मालिकेनंतर माझी कारकीर्द संपवणार.'

(Sports Latest News)