आर्ची म्हणतो विराटचा 'तो' निर्णय योग्यच

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

ऑस्ट्रेलियन संघात उपकर्णधार म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या 7 वर्षांच्या आर्ची शिलरने त्याचे वडिल जे सल्ला देतात, तोच निर्णय भारताचा कर्णधार विराट कोहलीने घेतल्याचे म्हटले आहे.

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन संघात उपकर्णधार म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या 7 वर्षांच्या आर्ची शिलरने त्याचे वडिल जे सल्ला देतात, तोच निर्णय भारताचा कर्णधार विराट कोहलीने घेतल्याचे म्हटले आहे.

हृदय रोगाशी झगडून जीवन जगत असलेल्या आर्ची शिलरचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया संघाच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात आले होते. आर्चीला ऑस्ट्रेलियन संघाची टोपी फिरकीपटू नॅथन लायनच्या हस्ते देण्यात आली होती. आर्चीची ऑस्ट्रेलिया संघात सहभागी होण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण करण्यात आली आहे. 

एका वृत्तपत्राशी बोलताना आर्ची शिलर म्हणाला, की माझे वडिल कायम सांगतात नाणेफेक जिंकली तर फलंदाजीचा निर्णय घ्यायला हवा. सुरवातीला फलंदाजी घेतली तर आपल्याला आवश्यक आवश्यक तेवढ्या धावा फलकावर झळकाविता येतात. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात असेच केले. विराट हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. माझा तो आवडता खेळाडू आहे. माझा ऑस्ट्रेलिया संघात समावेश झाल्याने माझे मित्र जळत आहेत.

Web Title: Australia's co-captain Archie Schiller names Virat Kohli as the best batsman in the world