esakal | Video : शिखाची कमाल, 'बॉल ऑफ द सेंच्युरी' बघाच | AUS W vs IND W
sakal

बोलून बातमी शोधा

Shikha Pandey And Alyssa Healy

Video : शिखाची कमाल, 'बॉल ऑफ द सेंच्युरी' बघाच

sakal_logo
By
सुशांत जाधव

भारतीय महिला संघाला (Indian Women's Team) ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघासमोर (Australia Women's Team) पराभवाचा सामना करावा लागला. दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाना भारतीय महिला संघाला 4 विकेट्सनी पराभूत करत मल्टी फॉर्मेट सीरिजवर नाव कोरले. या सामन्यात भारताची जलदगती गोलंदाज शिखा पांड्येनं टाकलेला चेंडू सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

शिखा पांड्येनं (Shikha Pandey) ऑस्ट्रेलियाची सलामीची बॅटर एलिसा हीली (Alyssa Healy) हिला बोल्ड केले. भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना हीली हिने शिखा पांड्येच्या पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार मारला. त्यानंतर शिखाने तिला टाकलेला चेंडू कमालीचा होता. अप्रतिम स्विंगवर शिखानं हीलीच्या दांड्या गुल केल्या.

हेही वाचा: हार्दिक पांड्यासंदर्भात रोहित शर्मानं केलं मोठ वक्तव्य

शिखा पांड्येनं ऑफ स्टम्पच्या बाहेर टाकलेला चेंडू इनस्विंग करत एलिसा हीलीला क्लीन बोल्ड केलं. सोशल मीडियावर तिच्या या विकेटची चांगलीच चर्चा रंगली आहे. तिच्या या चेंडूला कोणी 'बॉल ऑफ द सेंच्युरी'ची उपमा देत आहे तर कोणी या चेंडूला 'बॉल ऑफ द ईयर' असे संबोधताना दिसते.

शिखा पांड्येच्या या अप्रतिम विकेटवर अनेक दिग्गज क्रिकेटर्संही प्रतिक्रिया देत आहे. वासीम जाफरने ट्वीटच्या माध्यमातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. तिने टाकलेला चेंडू महिला क्रिकेटमधील 'बॉल ऑफ द सेंच्युरी' असल्याचा उल्लेख जाफरनं केलाय.

हेही वाचा: मेग्रासमोर भारतीय महिला संघ ठरला हतबल

शिखा पांड्येनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात एकमेव विकेट घेतली. 4 ओव्हरमध्ये तिने 27 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली. धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाला भारतीय महिला संघाने सुरुवातीला धक्के दिले. पण अखेरच्या टप्प्यात ताहिला मेग्रानं केलेल्या 42 धावांच्या चिवट आणि नाबाद खेळीमुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

loading image
go to top