३८ धावांत अर्धा संघ तंबूत, तरीही विजयाचा डाव पलटला! सहाव्या नंबरवर आलेल्या गोलंदाजाने अशक्य ते शक्य केलं! क्रिकेट विश्वात नवा विक्रम!

Azmatullah Omarzai Smashes Historic 116-Run Century Against Zimbabwe: अजमतुल्लाह उमरजईने झिम्बाब्वेविरुद्ध ५० चेंडूंत ११६ धावांचे वादळी शतक झळकावत ऐतिहासिक विक्रम केला. अफगाणिस्तानने दुसऱ्या टी-२० सामन्यात १९ धावांनी विजय मिळवला.
Afghanistan's Azmatullah Omarzai celebrates his historic 116-run century off 50 balls against Zimbabwe in the second T20I, helping Afghanistan post 222 runs and secure a 19-run victory

Afghanistan's Azmatullah Omarzai celebrates his historic 116-run century off 50 balls against Zimbabwe in the second T20I, helping Afghanistan post 222 runs and secure a 19-run victory

esakal

Updated on: 

अफगाणिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात अजमतुल्लाह उमरजईने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर ऐतिहासिक कामगिरी केली. सुरुवातीला अवघ्या पाच धावांत चार गडी गमावल्यामुळे अफगाणिस्तानचा संघ अडचणीत सापडला होता. त्यानंतर ३८ धावांवर निम्मा संघ माघारी परतल्याने झिम्बाब्वेचा विजय जवळपास निश्चित असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या उमरजईने परिस्थिती पालटली. त्याने शतकी खेळी करत संघाला संकटातून बाहेर काढले आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला.

Loading content, please wait...