Babar Azam : फक्त 27.78 स्ट्राईक रेट! वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात बाबर आझम फेल

बाबर आझम: Only 27.78 strike rate
Babar Azam World Cup 2023
Babar Azam World Cup 2023 esakal

Babar Azam World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप 2023 च्या दुसऱ्या सामन्यात आज पाकिस्तान आणि नेदरलँड यांच्यात लढत होत आहे. पाकिस्तानसाठी हा सामना साधाच असला तरी सामन्याच्या सुरूवातीलाच पाकिस्तानची अवस्था वाईट झाली.

नेदरलँडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानचे पहिले तीन फलंदाज स्वस्तात माघारी धाडले. त्यात संघाचा कर्णधार बाबर आझमचा देखील समावेश होता. बाबर आझमने वनडे वर्ल्डकप 2023 ची सुरूवात अत्यंत खराब केली आहे.

Babar Azam World Cup 2023
MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीची मुंबई इंडियन्सच्या 'रिलायन्स'सोबत नवी इनिंग, अंबानींनी बनवले...

बाबर आझमच्या 18 चेंडूत 5 धावा

बाबर आझमने वनडे वर्ल्डकप 2023 च्या सराव सामन्यात 90 धावांची खेळी करून सर्वांचे लक्ष वेधले होते. बाबर आझम हा पहिल्यांदाच भारतात खेळत आहे. त्यामुळे तो इथे कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचेच लक्ष होते.

नेदरलँडविरूद्धच्या पहिल्या सामन्यात बाबर आझम चांगली फलंदाजी करेल अशी आशा होती. मात्र त्याला 18 चेंडूत फक्त 5 धावात करता आल्या. त्याने 27.78 च्या स्ट्राईक रेटने या 5 धावा केल्या. त्याला एकरमॅनने बाद केले.

Babar Azam World Cup 2023
India Vs Pakistan : शड्डू फक्त भारताचाच घुमणार! भारताने पाकिस्तानला सहज लोळवत रौप्य पदक केलं निश्चित

बाबर आझम सोबतच पाकिस्तानचे दोन्ही सलामीवीर फखर जमान आणि इमाम उल हक यांना देखील फारशी चमक दाखवता आली नाही. फखर जमानने 15 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 12 धावा केल्या. मात्र त्याला वॅन बीकने बाद केले.

इमार उल हकने 19 चेंडू खेळले त्यात 2 चौकार मारले. त्याने 15 धावा केल्या होत्या. मात्र त्याला मीकेरेनने बाद करत पाकिस्तानची अवस्था 3 बाद 38 धावा अशी केली.

पाकिस्तानच्या या खराब सुरूवातीनंतर मोहम्मद रिझवान आणि सौद शकील या मधल्या फळीतील फलंदाजांनी पाकिस्तानचा डाव सावरला. त्यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत पाकिस्तानला 130 धावांच्या पार पोहचवले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com