IND vs PAK : पाक सामन्यापूर्वी बाबरला गावसकरांनी दिला हा गुरुमंत्र, टीम इंडियाला जाऊ नये जड! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

  babar azam met sunil gavaskar

IND vs PAK : पाक सामन्यापूर्वी बाबरला गावसकरांनी दिला हा गुरुमंत्र, टीम इंडियाला जाऊ नये जड!

Babar Azam Met Sunil Gavaskar : टी-20 विश्वचषकात 23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना प्रत्येकी दोन सराव सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. सोमवारी झालेल्या पहिल्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. दुसरीकडे पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांच्याकडून फलंदाजीच्या युक्त्या शिकताना दिसला.

हेही वाचा: Ind Vs Aus T20 WC: 'ये तो प्लान था...', अखेरच्या षटकात शमीची वाईल्ड कार्ड एंट्री

सुनील गावसकर आणि बाबर भेटीचा व्हिडिओ पीसीबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक सकलेन मुश्ताक आणि फलंदाजी प्रशिक्षक मोहम्मद युसूफ देखील दिसत आहेत. बाबर आणि सुनील गावसकर यांची भेट एका खासगी पार्टीदरम्यान झाली होती. यादरम्यान माजी भारतीय कर्णधाराने बाबरला टोपीवर ऑटोग्राफही दिला आणि वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

हेही वाचा: Mohammed Shami : 'हा असा यॉर्कर टाकायचा!' गुरू शमी अन् शिष्य आफ्रिदीचा फोटो होतोय व्हायरल

बाबरलाही गावसकरकडून फलंदाजीबाबत विशेष सल्ला मिळाला. बाबरला गावसकर म्हणाले की, शॉट सिलेक्शन चांगली असेल तर काही अडचण नाही. परिस्थितीनुसार शॉट निवडायला हरकत नाही.

भारत आणि पाकिस्तानचे संघ वर्षभरानंतर टी-20 विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. दुबईत गेल्या वेळी पाकिस्तानने टीम इंडियाचा 10 विकेट्सने पराभव केला होता. पाकिस्तानने भारताकडून विश्वचषक जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. आशिया कपमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले. त्यानंतर भारताने एक सामना जिंकला. पाकिस्तानने एक सामना जिंकला होता. यावेळी भारतीय संघ गेल्या विश्वचषकातील पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरेल.