Mohammed Shami : 'हा असा यॉर्कर टाकायचा!' गुरू शमी अन् शिष्य आफ्रिदीचा फोटो होतोय व्हायरल

कोण कोणाला देत आहे टिप्स? शाहीन शाह आफ्रिदी आणि मोहम्मद शमीचा फोटो व्हायरल
mohammed shami give some bowling tips to shaheen shah afridi
mohammed shami give some bowling tips to shaheen shah afridi

Mohammed Shami Shaheen Afridi : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सराव सामन्यात धुमाकूळ घातला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याची निवड झाली होती, मात्र मालिकेपूर्वीच तो कोरोनाला बळी पडला. तो कोरोनामधून बरा झाल्यानंतर टीम इंडियामध्ये सामील झाला आणि सराव सामन्यातच कहर करून टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

mohammed shami give some bowling tips to shaheen shah afridi
Virat Kohli : मानलं! सराव सामन्यातही विराटची जीव तोडून फिल्डिंग

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सराव सामना जिंकला, त्यादरम्यान मोहम्मद शमी सर्वाधिक चर्चेत राहिला. त्याच वेळी या खेळाडूच्या चर्चेत येण्याची अनेक कारणे होती आणि यादरम्यान त्याचा एक फोटो देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी एकत्र बोलताना दिसले.

mohammed shami give some bowling tips to shaheen shah afridi
Mohammed Shami : एक ही मारा मगर सॉलिड मारा! षटक 1 धावा 4 विकेट 4 अजून काय पाहिजे?

हा फोटो पाहता शमी इथे पाकिस्तानी फास्ट बॉलरला काही टिप्स देत असल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण सामन्यात शमीला 19 व्या षटकापर्यंत गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. कर्णधार रोहित शर्माने त्याच्याकडे शेवटच्या षटकासाठी चेंडू दिला. अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 11 धावांची गरज होती. शमीने शेवटच्या षटकात येताच खळबळ उडवून दिली. शमीने तीन विकेट घेतल्या आणि 11 धावांचा बचाव केला. भारताने हा सामना 6 धावांनी जिंकला.

mohammed shami give some bowling tips to shaheen shah afridi
T20 World Cup : लंकेचा कित्ता विंडीजनेही गिरवला! स्कॉटलँडचा 42 धावांनी मोठा विजय

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीही दुखापतीनंतर तंदुरुस्त होऊन ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. जवळपास 3 महिने तो एकही सामना खेळलेला नाही. संघ आज इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात उतरणार आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 186 धावा केल्या. केएल राहुलने 33 चेंडूत 57 धावा आणि सूर्यकुमार यादवने 33 चेंडूत 50 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 19 षटकांत 6 गडी गमावून 176 धावा केल्या. भारतीय संघ आता 19 ऑक्टोबरला दुसऱ्या सराव सामन्यात न्यूझीलंड संघाशी भिडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com