
Ind Vs Aus T20 WC: 'ये तो प्लान था...', अखेरच्या षटकात शमीची वाईल्ड कार्ड एंट्री
Ind Vs Aus T20 WC : द्वेन्टी २० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज संघातील इतर खेळाडूंपेक्षा मोहम्मद शमीसाठी सर्वांत मोठा सराव पेपर होता. त्यात तो पूर्णपणे यशस्वी झाला. डेथ ओव्हर ही भारतीय संघाची कमकुवत बाजू राहिली आहे. हाच पेपर रोहितने शमीसमोर दिला आणि त्याने त्यात पूर्ण मार्क मिळवले. या सराव सामन्यात शमीला कधी गोलंदाजी द्यायची हाच तर खरा प्लान होता. प्रदीर्घ कालावधीनंतर शमी संघात खेळत आहे. मुख्य स्पर्धेस सामोरे जाण्यापूर्वी शमीसमोर जास्तीत जास्त असावे, असा विचार आम्ही केला होता, परंतु त्याला अखेरच्या -षटकात गोलंदाजी दिली आणि त्याने विश्वास सार्थ ठरवला, असे मत रोहित शर्माने व्यक्त केले.
हेही वाचा: PAK vs ENG : इंग्लंडने 14.4 षटकातच पार केले टार्गेट! पहिल्या सराव सामन्यात पाकची बॉलिंग फेल
अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ११ धावांची गरज व्होती, त्यात चार विकेट शिल्लक -असल्यामुळे पारडे त्यांच्या बाजूला झुकले होते, पण शमीने चार धावा दिताना तीन विकेट मिळवले. चौथा फलंदाज धावचित झाला आणि भारताला विजय मिळाला.
शमी नव्या चेंडूवर किती प्रभावी ठरतो याची कल्पना आम्हाला आहे, पण डेथ ओव्हरमध्ये त्याचा प्रभाव अजूनही कायम आहे का, याची परीक्षा आम्हाला घ्यायची होती, म्हणून मी त्याला डावातील अखेरच्या षटकांत गोलंदाजी दिली, असे रोहितने सामन्यानंतर सांगितले.
हेही वाचा: Sourav Ganguly : आयसीसीसाठी गांगुलींची शिफारस ?
सुधारणा करण्यास अजून वाव हा सामना जिंकला असला तरी अजूनही सुधारणा करायची आहे. चेंडूचा योग्य टप्पा मिळवल्यानंतर त्यात सातत्य राखण्याचा अभ्यास करावा लागणार आहे. याच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात खेळलो ती परिस्थिती वेगळी होती, आता ऑस्ट्रेलियात खेळताना वेगळी आव्हाने आहेत. त्यानुसार बदल करून खेळ करावा लागणार आहे, + असे रोहित म्हणाला.
आमची फलंदाजी चांगली झाली, पण अजून १० ते १५ धावा करायला हव्या होत्या. एकदा जम बसल्यानंतर त्यात वाढ होत राहणे आवश्यक आहे. कधी कधी आम्ही त्यात कमी पडतो. ज्या फलंदाजाचा चांगला जम बसेल त्याने अखेरपर्यंत मैदानात राहण्यावर भर द्यायला हवा, सूर्यकुमारने आज तसा खेळ केला, असेही रोहितने सांगितले.