
तुझमें रब दिखता है! सचिन नव्हे तर बाबर आझमचा क्रिकेटमध्ये वेगळाच देव
नवी दिल्ली : बाबर आझम सध्याच्या काळात सातत्याने रन्स करत आहे. बाबरने जागतिक क्रिकेटमध्ये त्याचा ठसा देखील उमटवला आहे. बाबर पाकिस्तान संघाचा कर्णधार झाल्यापासून संघाचा रंग रूप बदलून टाकले आहे. पाकिस्तानची कामगिरी सातत्याने चांगली होत असून, त्यात बाबर आझमचे सर्वाधिक कौतुक केले जात आहे. मात्र आता बाबर आझम एक असे विधान केले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. बाबर आझमच्या मते सचिन क्रिकेटचा देव नाही. सचिन तेंडुलकरला क्रिकेटच्या देवाची उपमा मिळाली आहे. क्रिकेट जगतात ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. पण बाबरचा क्रिकेटमधील देव सचिन तेंडुलकर नाही. त्याचा एक वेगळाच देव आहे.(Babar Azam Said Sachin Tendulkar Not God Of Cricket)
हेही वाचा: मॅचदरम्यान मुलीनं RCB चाहत्याला केलं प्रपोज; नेटकरी म्हणाले, IPL पाहिला आलोय...
बाबर आझमने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीला क्रिकेटचा देव म्हटले आहे. बाबर आझम म्हणाले की, शाहिद आफ्रिदी हा त्याच्या काळातील असा क्रिकेटर आहे ज्याने एकट्याने पाकिस्तानला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला. जोपर्यंत आफ्रिदी क्रीजवर असायचा तोपर्यंत विरोधी संघाचा श्वास रोखल्या जायचा. आफ्रिदीच्या नावावर त्यावेळी सर्वात वेगवान शतक आणि सर्वात वेगवान अर्धशतक होते. बाबर आझम हा सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. बाबर आझमची गणना सध्याच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. आयसीसी क्रमवारीत बाबर आझमचे वर्चस्व कायम आहे.(Babar Azam on Sachin Tendulkar)
हेही वाचा: मुकेश चौधरीच्या 'त्या' थ्रोमुळे विराटचे चाहते संतापले - पाहा व्हिडिओ
बाबर आझम आफ्रिदीला जगातील सर्वोत्तम फलंदाज मानतो. तसे सचिन तेंडुलकरला 'क्रिकेटचा भगवान' म्हटले जाते. पण क्रिकेटचे गुरू आणि देव सर्व खेळाडूंसाठी वेगळे असतात. तसेच बाबरसाठी क्रिकेटचा देव शहीद आफ्रिदी आहे.
Web Title: Babar Azam Said Sachin Tendulkar Not God Of Cricket Shahid Afridi God
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..