मॅचदरम्यान मुलीनं RCB चाहत्याला केलं प्रपोज; नेटकरी म्हणाले, IPL पाहिला आलोय की विवाहसोहळा... | Girl proposed during IPL Match | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rcb vs csk match girl proposed to boyfriend during in ipl 2022

मॅचदरम्यान मुलीनं RCB चाहत्याला केलं प्रपोज; नेटकरी म्हणाले, IPL पाहिला आलोय...

आयपीएलच्या हंगामामध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यांच्यात सामना खेळला गेला. 49 व्या सामन्याचा थरार शेवटच्या षटकापर्यंत पाहिला मिळाला. अखेरीस बेंगळुरूने चेन्नई सुपर किंग्सवर 13 धावांनी विजय मिळवला. या सगळ्यामध्ये कॅमेऱ्यात अशी घटना कैद झाली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एका मुलीने गुडघ्यावर बसून आरसीबीच्या फॅन मुलाला प्रेक्षकांसमोर प्रपोज केले. मुलाने हो म्हटल्यावर मुलीनेही त्याला अंगठी घातली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि एकमेकांचे झाले. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर एका नेटकरीने विचारले- मी आयपीएल पाहिला आलो विवाहसोहळा पाहत आहे.(Live Match Girl Proposed To Boyfriend)

चेन्नईच्या डावचा 11व्या षटकात 5 चेंडू होते त्यावेळी ही घटना घडली. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवे आणि मोईन अली क्रीजवर खेळत होते. यादरम्यान लाल रंगाचा टॉप घातलेली मुलगी स्टँडमध्ये उठली आणि गुडघ्यावर बसून तिने शेजारी उभ्या असलेल्या मुलाला प्रपोज केले. मुलाने लगेच हो म्हटलं त्याने आरसीबीची जर्सी घातली होती.

हेही वाचा: RCB सोबत 'प्रामाणिक' तर मुलीशी पण प्रामाणिक' थेट स्टेडिअममध्ये प्रपोज

चेन्नई संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 8 गडी गमावून 173 धावा केल्या. महिपाल लोमररने 27 चेंडूत 42 तर कर्णधार डू प्लेसिसने 22 चेंडूत 38 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नईला 8 गडी बाद 160 धावा करता आल्या. डेव्हन कॉनवेने 37 चेंडूत 56 धावा केल्या, तर मोईन अलीने 34 आणि ऋतुराज गायकवाडने 28 धावा केल्या. याशिवाय संघाच्या एकाही फलंदाजाला 20 धावांचा पल्ला गाठता आला नाही.

Web Title: Rcb Vs Csk Match Girl Proposed To Boyfriend During In Ipl 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPL
go to top