
मुकेश चौधरीच्या 'त्या' थ्रोमुळे विराटचे चाहते संतापले - पाहा व्हिडिओ
IPL 2022L: चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB vs CSK) यांच्यात आयपीएलचा 49 वा सामना धमाकेदार पाहिला मिळाला. आरसीबीने हा सामना 13 धावांनी जिंकला. पण आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा फलंदाजीत काही खास करू शकला नाही. पण या सामन्यात एक दृश्य असे पाहायला मिळाले, की विराटच्या चाहत्यांचा पारा चढला. कोहली फलंदाजी करत असताना त्याला CSKचा गोलंदाज मुकेश चौधरीने (Mukesh Chaudhary) जबरदस्त थ्रो मारून खाली पाडलं. आरसीबीच्या डावाच्या पहिल्याच षटकात विराट मुकेशचा चेंडू खेळताना क्रीजमधून बाहेर आला, तो चेंडू मुकेशच्या हातात आला आणि त्यांनी चेंडू विकेटमध्ये मारण्याऐवजी विराटला मिळाला. पण चांगली गोष्ट म्हणजे या थ्रोमुळे विराटला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.(Mukesh Chaudhary Hits Virat Kohli)
हेही वाचा: काळ बदलला, जग बदललं पण धोनीचा अंदाज...
हेही वाचा: मॅचदरम्यान मुलीनं RCB चाहत्याला केलं प्रपोज; नेटकरी म्हणाले, IPL पाहिला आलोय...
मुकेश चौधरीचा थ्रो थेट किंग कोहली लागला पण तो रागावला नाही. चेंडू लागूनही त्याच्या चेहऱ्यावर हसू दिसलं. विराटला चेंडू लागल्यानंतर मुकेशने आपली चूक मान्य केली आणि तो विराटला सॉरी बोलला. मात्र या घटनेनंतर विराटचे चाहते मुकेश वर चांगलेच संतापले आणि त्याला ट्रोलही केले. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (RCB) चेन्नई सुपर किंग्जला (CSK) 13 धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 8 गडी गमावून 173 धावा केल्या. प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 160 धावा केल्या. या पराभवासह सीएसकेही प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
Web Title: Mukesh Chaudhary Hit Firing Throw To Virat Kohli Fell Down Fans Angry Watch Video
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..