सिंधू, प्रणोयचे आव्हान संपुष्टात; आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत भारतीयांचे अपयश

भारतीय खेळाडूंची आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील सुमार कामगिरी गुरुवारीही कायम राहिली. महिला विभागात पी. व्ही. सिंधू व पुरुष विभागात एच. एस. प्रणोय या दोघांचाही पराभव झाला. त्यामुळे या दोघांचेही प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
Badminton Asia Championships 2024 pv sindhu hs prannoy lost
Badminton Asia Championships 2024 pv sindhu hs prannoy lostSakal

निंगबो (चीन) : भारतीय खेळाडूंची आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील सुमार कामगिरी गुरुवारीही कायम राहिली. महिला विभागात पी. व्ही. सिंधू व पुरुष विभागात एच. एस. प्रणोय या दोघांचाही पराभव झाला. त्यामुळे या दोघांचेही प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

चीनच्या हॅन युई हिने सिंधूची कडवी लढत २१-१८, १३-२१, २१-१७ अशी मोडून काढली. चीन तैपईच्या लिन चून यी याने प्रणोय याच्यावर २१-१८, २१-११ असा विजय साकारला. पी. व्ही. सिंधू हिने पहिल्या गेममध्ये दमदार सुरुवात केली.

८-४ अशी आघाडी घेणाऱ्या सिंधूने पुढे जाऊन आपला खेळ उंचावला आणि ही आघाडी १४-८ अशी पुढे नेली; मात्र यानंतर हॅन हिने सिंधूकडून झालेल्या चुकांचा फायदा घेतला. चीनच्या खेळाडूने प्रदीर्घ रॅलीचा खेळ करीत सिंधूला थकवले व १५-१५ अशी बरोबरी साधली.

त्यानंतर तिने २१-१८ असा पहिला गेम आपल्या नावावर केला. सिंधूने दुसऱ्या गेममध्ये आक्रमक खेळ केला. तिच्या आक्रमणासमोर हॅन हिचा निभाव लागला नाही. अखेर २१-१३ अशी बाजी मारण्यात सिंधूला यश मिळाले. दरम्यान, महिला दुहेरीत तनीषा क्रॅस्टो - अश्‍विनी पोन्नाप्पा या भारतीय जोडीलाही पराभवामुळे निराश व्हावे लागले.

संधी गमावली

पी. व्ही. सिंधू - हॅन युई यांच्यामध्ये तिसऱ्या गेममध्ये चुरस पाहायला मिळाली. सिंधू हिने सुरुवातीला ८-४ अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली; पण हॅन हिने झोकात पुनरागमन करताना १०-१० अशी बरोबरी साधली. त्यानंतर सिंधू बॅकफूटवर गेली. हॅन हिने १७-१० अशी आघाडी मिळवली.

सिंधूने थोडीफार झुंज देताना ही आघाडी २०-१७ अशी कमी केली; पण तिला काही विजय मिळवता आला नाही. हॅन हिने २१-१७ असा हा गेम जिंकत सामनाही आपल्या नावावर केला. हॅन हिने सिंधूला प्रथमच नमवले. सिंधूने याआधी तिच्याविरुद्ध पाच सामने जिंकले होते.

सरळ दोन गेममध्ये मात

एच. एस. प्रणोय - लिन चून यी यांच्यामधील लढतीत पहिल्या गेममध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला; मात्र ब्रेकपर्यंत लिन याने ११-७ अशी आघाडी घेतली. प्रणोयने तोडीस तोड खेळ करीत १५-१५ अशी बरोबरी साधली. लिन याने २१-१८ असा पहिला गेम जिंकताना प्रणोयला मागे टाकले. दुसऱ्या गेममध्ये लिन याने ड्रॉप शॉटस्‌ व आक्रमक स्मॅशेसच्या जोरावर प्रणोयवर वर्चस्व गाजवले. हा गेम त्याने २१-११ असा जिंकला व विजयासह आगेकूच केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com