सायनला हरवणाऱ्या मालविकाच्या डॉक्टर आईने मुलीसाठी सोडले घर | Malvika bansod Doctor Mother Sacrifice | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malvika bansod Doctor Mother Sacrifice
सायनला हरवणाऱ्या मालविकाच्या डॉक्टर आईने मुलीसाठी सोडले घर

सायनला हरवणाऱ्या मालविकाच्या डॉक्टर आईने मुलीसाठी सोडले घर

नागपूर : भारताची फुलराणी म्हणून ओळखली जाणारी सायना नेहवाल (saina nehwal) इंडिया ओपन बॅडमिंटन (Badminton) स्पर्धेत दुसऱ्याच फेरीत गारद झाली. तिला गारद करणारी दुसरी तिसरी कोणी नसून मराठमोळी मालविका बनसोड (Malvika bansod) आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या आणि इंडिया ओपनची माजी विजेती सायना नेहवालचा मालविका बनसोडने २१ - १७, २१ - ९ असा सरळ गेममध्ये पराभव केला. विशेष म्हणजे मालविकाने सायनाचे स्पर्धेतील आव्हान फक्त ३५ मिनिटातच संपवले. (Malvika bansod Doctor Mother Sacrifice)

हेही वाचा: नागपूर : मालविका बन्सोड चा ऐतिहासिक अन्‌ अभिमानास्पद विजय

सायनाला पराभूत करणारी मालविका ही पी. व्ही. सिंधू (PV Sindhu) नंतरची दुसरीच भारतीय बॅडमिंटनपटू आहे. मालविकाच्या कारकिर्दितील या सर्वात मोठ्या विजयाला मालिवाकाच्या आईचाही (Malvika bansod Doctor Mother) मोठा हातभार आहे. मालविकाच्या बॅडमिंटनसाठी तिची आई डॉ. तृप्ती बनसोड (Dr. Trupti Bansod) यांनी आपले घर नंतर डॉक्टरी पेशा देखील सोडला. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या आईसाठी स्पोर्ट्स सायन्सची पदवी देखील घेतली.

हेही वाचा: भारतीय फलंदाजांनी १४५ वर्षात झाले नाही ते करुन दाखवले

मालविका रायपूरमध्ये सराव करते. मालविका २०११ पासून बॅडमिंटन (Badminton) खेळते. आपल्या मुलीसाठी २०१६ मध्ये तृप्ती यांनी नागपुरातून रायपूरमध्ये शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांची प्रॅक्टिसही प्रभावित झाली. आपल्या मुलीसाठी तृप्ती यांनी डेंटिस्टच्या शिक्षणानंतर स्पोर्ट्स सायन्समध्येही (Sports Science) मास्टर्स केले.

मालविकाने बॅडमिंटन बरोबरच आपल्या अभ्यासावरही तेवढचे लक्ष केंद्रीत केले. तिने १० वी आणि १२ वी मध्ये ९० टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. याच दरम्यान तिने सात आंतरराष्ट्रीय पदकं देखील जिंकली होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Saina NehwalBadminton
loading image
go to top