Prannoy H S : एचएस प्रणोय पुन्हा पहिल्या १५ खेळाडूंत

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू एचएस प्रणोयने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुन्हा पहिल्या १५ खेळाडूंत स्थान मिळवले आहे
Prannoy H.S.
Prannoy H.S.sakal

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू एचएस प्रणोयने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुन्हा पहिल्या १५ खेळाडूंत स्थान मिळवले आहे. जागतिक अजिंक्यपद आणि जपान ओपन सुपर ७५० या स्पर्धांत प्रणोयने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती, त्याचा फायदा झाला आहे.भारताचा नवा आशास्थान असलेला लक्ष्य सेन भारतीयांमधील सर्वात चांगले स्थान असलेला खेळाडू ठरला आहे. पुरुषांच्या क्रमवारीत तो नवव्या; तर किदांबी श्रीकांत ११ व्या स्थानावर आहे.

दोन ऑलिंपिक पदकांची विजेती पी. व्ही. सिंधू जागतिक आणि जपान ओपन स्पर्धेत दुखापतीमुळे खेळली नसली, तरी तिचे महिलांच्या क्रमवारीतील सहावे स्थान कायम राहिले आहे. साईना नेहवालने एका स्थानाने प्रगती करत ३१ वा क्रमांक मिळवला आहे.

पुरुष दुहेरीतील भारताची हुकमी जोडी सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी हे पुरुष दुहेरीतील आठव्या क्रमांकावर कायम आहेत. त्यांनी जागतिक स्पर्धेत पहिले वहिले ब्राँझपदक जिंकल्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकावर आपला हक्क सिद्ध केला होता. महिलांच्या दुहेरीत अश्विनी पोनाप्पा आणि सिक्की रेड्डी २३ व्या स्थानावर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com