बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने दिला रशियन बेलारूसच्या खेळाडूंना दणका

Badminton World Federation suspending athletes from Russia Belarus
Badminton World Federation suspending athletes from Russia Belarus esakal

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या शिफारसीनुसार आता बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (BWF) देखील रशिया आणि बेलारूसच्या खेळाडू (Russia Belarus Players Ban) आणि अधिकाऱ्यांवर बंदी घातली आहे. हा निर्णय रशियाने युक्रेनवर आक्रमण (Russia Ukraine Crisis) केल्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (Badminton World Federation) याआधीच रशिया आणि बेलारूसमधील सर्व स्पर्धा रद्द केल्या आहेत.

Badminton World Federation suspending athletes from Russia Belarus
रोहित शर्माचे ट्विटर अकाऊंट हॅक? असंबंध ट्विट्सची मालिका

बॅडमिंटनच्या (Badminton) वरिष्ठ संघटनेने आपल्या अधिकृत वक्तव्यात सांगितले की, आम्ही रशिया आणि बेलारूस सरकारविरूद्धचे निर्बंध अजून कडक करण्यात सहमती दर्शवली आहे. आम्ही रशिया आणि बेलारूसच्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांना BWF च्या सर्व आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून निलंबित करत आहोत. यापूर्वी बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने रशिया आणि बेलारूसमधील सर्व स्पर्धा रद्द केल्या होत्या. याचबरोबर बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनमध्ये रशियन आणि बेलारूसचा (Belarus) राष्ट्रीय ध्वज फडकणार नाही, राष्ट्रगीत वाजणार नाही अशीही घोषणा करण्यात आली होती. तसेच पुढचा निर्णय होईपर्यंत कोणतीही बॅडमिंटन स्पर्धा रशिया आणि बेलारूसला दिली जाणार नाही.

Badminton World Federation suspending athletes from Russia Belarus
‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ पुतिन यांचा अपमानावर अपमान

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सगळ्या क्रीडा संघटनांना रशिया आणि बेलारूसमधील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची विनंती केली होती. याचे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने पूर्णपणे समर्थन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com