
पूनियाने 65 किलो वजनी गटातील फ्रि स्टाइल कुस्ती प्रकारात ऑलिम्पिक पात्रता सिद्ध केली आहे. तो मिशीगनच्या क्लिफ कीन कुस्ती क्लबमध्ये 4 डिसेंबरपासून ऑलिम्पिकची तयारी करत आहे. त्याचा सराव कालावधी वाढल्यामुळे खर्च आणखी वाढणार आहे.
नवी दिल्ली : ऑलिम्पिकच्या तयारीला लागलेला कुस्तीपटू बजरंग पूनियाला अमेरिकेत आणखी काही दिवस सराव करण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे. सरावाची मुदत वाढवण्याचा साईने घेतलेल्या निर्णयामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत त्याला अमेरिकेतच सराव करणे शक्य होणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) यासंदर्भात माहिती दिली आहे.
AUSvsIND : सिडनीत टीम इंडिया कांगारुंविरोधात यॉर्कर शस्त्राचा वापर करणार?
पूनियाने 65 किलो वजनी गटातील फ्रि स्टाइल कुस्ती प्रकारात ऑलिम्पिक पात्रता सिद्ध केली आहे. तो मिशीगनच्या क्लिफ कीन कुस्ती क्लबमध्ये 4 डिसेंबरपासून ऑलिम्पिकची तयारी करत आहे. त्याचा सराव कालावधी वाढल्यामुळे खर्च आणखी वाढणार आहे.
साईने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा सराव कालावधी वाढल्यामुळे यासाठी 11.65 लाख रुपयांचा खर्च वाढणार आहे. मागील आठवड्यात मिशन ऑलिम्पिक विभागाची बैठत पार पडली. या बैठकीतच पूनियाला सरवासाठी आणखी मुदत वाढवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती साईने दिली.
क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्यांसाठी सकाळच्या स्पोर्ट्स साईटला भेट द्या
अमेरिकेत चांगल्या प्रकारे सराव होत आहे. याठिकाणी चांगली सुविधा तर आहेच याशिवाय तुल्यबळ मल्लही मिळत असल्यामुळे जोमाने सराव होण्यास मदत होत असल्याचेही पूनियाने म्हटले आहे. याठिकाणी कॉलेजमध्ये शिकणारे 65 किलो वजनी गटातील अनेक दर्जेदार मल्ल सराव करण्यासाठी येतात. त्यांच्यासोबत सराव करणे फायदेशीर वाटते. भारतामध्ये सराव करताना 74 किंवा 79 किलो वजनी गटातील पैलवानासोबत सराव करावा लागतो, असा उल्लेखही त्याने केला आहे.