Vinesh Phogat | Bajrang PuniaSakal
क्रीडा
Vinesh Phogat: 'माना पदक छीना गया तुम्हारा...', विनेशची याचिका CAS ने फेटाळल्यानंतर बजरंग पुनियाची पोस्ट चर्चेत
Bajrang Punia on Vinesh Phogat's CAS appeal rejected: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवण्याविरुद्ध क्रीडा लवादाकडे दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली, याबाबत बजरंग पुनियानेही प्रतिक्रिया दिली आहे.
Vinesh Phogat's CAS appeal rejected: भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिने पॅरिस ऑलिम्पिकमधील अपात्रेविरुद्ध क्रीडा लवादाकडे केलेली याचिका बुधवारी (१४ ऑगस्ट) फेटाळण्यात आली. याबाबत आता भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने भाष्य केले आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटातून विनेश खेळत होती. तिने अंतिम फेरीमध्ये धडकही मारली होती. मात्र, अंतिम फेरीपूर्वी १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने ऑलिम्पिक समितीने तिच्यावर ही कारवाई केली. त्यामुळे तिला अंतिम सामना खेळता आला नाही.