BAN VS AFG World Cup 2023 : बांगला-अफगाण कोण देणार सलामी?

बांगलादेशने मायदेशात झालेली न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावली होती.
ICC WORLD CUP
ICC WORLD CUPsakal

धरमशाला - अनुभवात बांगलादेशचा संघ वरचढ असला तरी अफगाणिस्तानने त्यांना गेल्या अनेक सामन्यांत नाकी दम आणला आहे. त्यामुळे एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत या दोन संघांत होणाऱ्या सामन्याचे भाकीत करणे कठीण आहे.

बांगलादेशमध्ये झालेली मालिका अफगाणिस्तानने २-१ अशी जिंकली होती, मात्र गेल्या महिन्यातील आशिया करंडक स्पर्धेतील सामन्यात बांगलादेशने अफगाणचा एकतर्फी पराभव केला होता. त्यामुळे दोन्ही संघांचे पारडे समतोल आहे.

बांगलादेशने मायदेशात झालेली न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावली होती. त्यानंतर आशिया करंडक स्पर्धेत त्यांना केवळ दोनच विजय मिळवता आले होते, त्यातील एक विजय अफगाणिस्तानविरुद्धचा होता. त्यानंतर बांगलादेश संघात मैदानाबाहेरही काही घडामोडी घडल्या, या विश्वकरंडक स्पर्धेसाठी बांगलादेशचा संघ भारतासाठी रवाना झाला.

ICC WORLD CUP
SL VS SA World Cup 2023 : श्रीलंका-दक्षिण आफ्रिका आज आमने-सामने

तीन वर्षांपूर्वी १९ वर्षांखालील विश्वकरंडक विजेतेपद मिळवणाऱ्या संघातील तौहिद हिरदोय, शौरिफुल इस्लाम, तान्झिद हसन आणि तान्झिम हसन असे खेळाडू या संघात आहेत. तरीही बांगलादेशची मदार अनुभवी शकिब आणि मुशफिकर रहिम यांच्यावर असणार आहे.

ICC WORLD CUP
ICC World Cup 2023 : क्रिकेट वर्ल्डकपसाठी एअरटेल अन् जिओने लाँच केले विशेष प्लॅन्स; स्वस्तात पाहता येणार सामने

दुसरीकडे अफगाणिस्तानचा संघ या विश्वकरंडक स्पर्धेसाठी अगोदरच पात्र ठरलेला असला तरी गेल्या चार वर्षांतील त्यांची कामगिरी सातत्यपूर्ण झालेली नाही. त्यामुळे त्यांनी आता अनुभवी खेळाडूंना पुनरागमन करण्याची संधी दिली आहे. रशीद खान, मुजीब उल रेहमान आणि मोहम्मद नबी या फिरकी गोलंदाजांवर त्यांची प्रमुख मदार असणार आहे. २०१९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत त्यांना एकही सामना जिंकता आला नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com