World Cup 2023 : वर्ल्ड कप सुरु असतानाच कर्णधार संघाला गेला सोडून, काय आहे कारण?

कर्णधार
Bangladesh captain Shakib Al Hasan returns home to Dhaka midway during the World Cup
Bangladesh captain Shakib Al Hasan returns home to Dhaka midway during the World Cup

Bangladesh captain Shakib Al Hasan returns home to Dhaka midway during the World Cup : एकदिवसीय वर्ल्ड कप-2023 मध्ये बांगलादेशचा संघ आतापर्यंत विशेष काही करू शकलेला नाही. अजून तरी या संघाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. बांगलादेशने आतापर्यंत एकूण पाच सामने खेळले असून त्यापैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. त्याला चारमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

अशा परिस्थितीत संघाचा कर्णधार शाकिब अल हसन संघाला सोडून एका व्यक्तीला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला आहे. शाकिब संघ सोडून ढाका येथे गेला आहे तर संपूर्ण संघ कोलकाता येथे पोहोचला आहे. जिथे त्यांना पुढील सामना खेळायचा आहे.

बांगलादेशला पुढील दोन सामने कोलकात्यात खेळायचे आहेत. 28 ऑक्टोबरला बांगलादेशला नेदरलँड्सविरुद्ध तर 31 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. दोन्ही सामने त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे असून उपांत्य फेरीच्या शर्यतीत राहण्यासाठी दोन्ही सामने जिंकावे लागतील.

या उर्वरित चार सामन्यांपूर्वी बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन भारत सोडून बांगलादेशची राजधानी ढाका येथे परतला आहे. तिथे त्याला त्याचा गुरू आबेदिन फहीम यांच्याकडे प्रशिक्षण घ्यायचे आहे. ESPNcricinfo या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, शाकिब अल हसन बुधवारी दुपारी ढाकाला पोहोचला.

शाकिब अल हसन त्याच्या गुरूसह थेट ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियममध्ये गेला, जिथे त्याने प्रथम थ्रोडाउन सत्र केले, जे सुमारे तीन तास चालले. त्याचे गुरू आबेदिन फहीम यांनी सांगितले की, तो आज येथे आला आहे, आम्ही पुढील तीन दिवस प्रशिक्षण घेऊ आणि त्यानंतर तो कोलकात्याला परत जाईल. बांगलादेश क्रिकेट संघाचे पुढील दोन सामने कोलकाता येथील ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहेत.

आता बांगलादेशच्या पुढील सामन्यांमध्ये शाकिब अल हसन कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com