...म्हणून बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या पेमेंटमध्ये कपात!

वृत्तसंस्था
Thursday, 6 February 2020

मुशफिकूर रहीमचे सर्वाधिक गुण आहेत. त्याने कसोटीमध्ये 574, तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 1172 गुण आहेत.

ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे त्यांचे मानधन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंनीसुद्धा या प्रस्तावाला दुजोरा दर्शविला आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून लवकरच नवीन करारपद्धत सुरु केली जाणार आहे. आंतराराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता खेळाडूंना प्रत्येक सामन्याचे मानधन दिले जाणार आहे. 

- 'तू किवींचा कोच नाही, हार्डवेअरच्या दुकानात काम कर'

मानधनाचे स्वरुप ठरविण्यासाठी त्यांनी गुणांची रचना सुरु केली आहे. ज्या खेळाडूचे जास्त गुण त्याला जास्त मानधन देण्यात येणार आहे तर कमी गुण असणाऱया खेळाडूला कमी मानधन देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यात शंभर टक्के प्रयत्न करण्याच्या उद्देशाने ही कार्यपद्धती सुरु करण्यात आहे. 

- आयुष्य किती क्षणभंगुर असते हे त्यामुळे कळले : विराट कोहली

या कार्यपद्धतीनुसार खेळाडूंना 2017 आधी झालेल्या कसोटी सामन्यांसाठी प्रत्येकी आठ गुण आणि 2018-19मध्ये झालेल्या कसोटी सामन्यांसाठी प्रत्येकी दहा गुण देण्यात आले आहेत. तसेच 2017 आधी झालेल्या एकदिवसीय आणि टी20 सामन्यांसाठी प्रत्येकी अनुक्रमे चार आणि तीन गुण देण्यात आले आहेत. 

यानुसार मुशफिकूर रहीमचे सर्वाधिक गुण आहेत. त्याने कसोटीमध्ये 574, तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 1172 गुण आहेत.

- U19 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणारा 'तो' असा झाला ‘यशस्वी’!

खेळाडूंचे महिन्याचे मानधन (बांगलादेशी रुपयांमध्ये) :

मुशफिकूर रहीम : 6.2 लाख
तमिम एक्बाल, महमद्दुल्ला रियाद : 6 लाख
लिटन दास, मेहदी हसन, रुबेल हुसैन : 3 लाख
मुस्तफिजूर रहीम : 2.5 लाख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladesh cricket board cut down players salaries due to poor performance in matches