esakal | बांगलादेशचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाला लोळवलं
sakal

बोलून बातमी शोधा

बांगलादेशचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाला लोळवलं

बांगलादेशचा ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियाला लोळवलं

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

BAN vs AUS : बांगलादेशने (Bangladesh) मंगळवारी ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. शाकीब अल हसन (Shakib Al Hasan) आणि नसुम मोहम्मद (Nasum Ahmed) यांच्या सर्वोत्कृष्ट खेळीच्या बळावर बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा (Australia) पराभव करत आपला ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये बांगलादेशने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. त्यामुळेच बांगलादेशसाठी हा विजय ऐतिहासिक आहे. पाच सामन्याच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना जिंकत बांगलादेशने मालिकेत आघाडी घेतली आहे.

पहिल्या टी-20 सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा 23 धावांनी पराभव केला आहे. नसुम मोहम्मद याच्या जाळ्यात कांगारुचे फलंदाज अडकले. नसुम मोहम्मद याने 19 धावांच्या मोबदल्यात चार गड्यांना बाद केलं. नसुम मोहम्मद याच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी गुडघे टेकले. बांगलादेशने दिलेलं 132 धावांचं सोप्पं आवाहनही ऑस्ट्रेलियाला पेलवलं नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ 108 धावांवर गारद झाला.

हेही वाचा: ...तर पाय अडकून पडाल, संजय राऊतांचा कोश्यारींना इशारा

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित 20 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 131 धावा केल्या होत्या. बांगलादेशकडून शाकिब अल हसन याने 36 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. प्रत्त्युरदाखल ऑस्ट्रेलियाचा संघ 108 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा मिशेल मार्श याने चोपल्या. मिशेल मार्श याने 45 धावांची खेळी केली. मार्शचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या 8 फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. 20 विश्वचषकाआधी खेळाडूंच्या ही कामगिरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला चिंतेत टाकणारी आहे.

हेही वाचा: पुणे : टिळक रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा

बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अद्याप चार टी-20 सामने बाकी आहेत. पाच टी-20 सामन्यात बांगलादेश संघाने 1-0 ने आघाडी घेत मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. उर्वरित सामने जिंकत पलटवार करण्याचा इरादा ऑस्ट्रेलियाचा असेल

loading image
go to top