World Cup 2023: पराभवानंतर संघाला मोठा धक्का! कर्णधारनं चूक केली मान्य अन् ICC ने ठोठावला दंड

Bangladesh fined for slow over rate in match against England
Bangladesh fined for slow over rate in match against England

Bangladesh Fined For Slow Over Rate World Cup 2023 : वर्ल्डकप 2023 चा सातवा सामना धर्मशालाच्या मैदानावर इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात रंगला होता. या सामन्यात बांगलादेशला 137 धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यानंतर आयसीसीने बांगलादेशलाही मोठा धक्का दिला आणि स्लो ओव्हर रेटसाठी संघाला मॅच फीच्या 5 टक्के दंड ठोठावला. गतविजेत्या इंग्लंड संघानेही या सामन्यासह विजयाचे खाते उघडले आहे.

Bangladesh fined for slow over rate in match against England
Ind vs Afg : अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात अश्विनचा ​​पत्ता कट? कर्णधार रोहित 'या' खेळाडूला देणार संधी

'या' सामन्यामध्ये मॅच रेफरीची भूमिका बजावत असलेले आयसीसी एलिट पॅनलचे सदस्य जवागल श्रीनाथ यांनी सामना संपल्यानंतर बांगलादेश संघाला निर्धारित वेळेपेक्षा एक षटक कमी टाकले होते. अशा परिस्थितीत त्याला आयसीसी आचारसंहितेच्या नियम 2.22 नुसार 5 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने ही चूक मान्य केली आहे.

इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यातील या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, संपूर्ण सामन्यात इंग्लिश संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले. फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 50 षटकात 9 गडी गमावून 364 धावा केल्या, ज्यामध्ये डेव्हिड मलानच्या फलंदाजीतून 140 धावांची शानदार खेळी पाहायला मिळाली. तर जो रूट आणि जॉनी बेअरस्टो यांनी अर्धशतकी खेळी खेळली.

प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 48.2 षटकांत 227 धावा करू शकला. संघाकडून फक्त लिटन दास आणि मुशफिकर रहीम यांनाच अर्धशतक झळकावता आले. बांगलादेशचा संघ सध्या 2 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. तर बांगलादेश संघ 13 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर तिसरा सामना खेळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com