अपयशी कामगिरीने बांगलादेशाने सहा खेळाडूंचा करार रोखला

वृत्तसंस्था
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

ढाका - गेल्या वर्षातील अपयशी कामगिरीनंतर बांगलादेश क्रिकेट मंडळाने सहा क्रिकेटपटूंचा करार रोखण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. त्याचबरोबर अन्य खेळाडूंच्या मानधनातील वाढ देखील रोखली आहे. करार रोखण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये सौम्या सरकार, इम्रूल कायेस, मोसडेक हुसेन, शब्बीर रहमान, टस्किन अहमद आणि काम्रूल इस्लाम राबी यांचा समावेश आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाने दहा खेळाडूंचाच करार कायम ठेवला असून, पुढे जाऊन यात केवळ तीन खेळाडूंची भर पडेल. त्याचवेळी करार कायम ठेवण्यात आलेल्या खेळाडूंना या वर्षी वाढ मिळणार नाही, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.
 
Web Title: Bangladesh have stopped six players from the failed performance