BAN vs AFG : बांगलादेशचा अफगाणवर सलामीला एकतर्फी विजय

९२ चेंडू आणि ६ विकेटने त्यांनी हा सामना जिंकला.
Bangladesh one-sided victory over Afghanistan in opener odi world cup 2023
Bangladesh one-sided victory over Afghanistan in opener odi world cup 2023sakal

धरमशाला : अफगाणिस्तानचे आव्हान एकदमच किरकोळ ठरवून बांगलादेशने एकदिवसीय विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत शानदार सलामी दिली. ९२ चेंडू आणि ६ विकेटने त्यांनी हा सामना जिंकला.

हिमाचल प्रदेशमधील डोंगराच्या कुशीत असलेल्या धरमशाला स्टेडियमवर प्रदीर्घ कालावधीनंतर झालेला हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना ५०-५० षटकांचा होता; परंतु दोन्ही मिळून ७२ षटकांचाच झाला.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानला ३७.२ षटकांत १५६ धावांत रोखल्यावर बांगलादेशने हे माफक आव्हान ३४.४ षटकांत पूर्ण केले. तीन विकेट आणि अर्धशतक अशी अष्टपैलू कामगिरी करणारा मेहदी हसन सामन्यात सर्वोत्तम ठरला.

प्रथम फलंदाजी मिळालेल्या अफगाणिस्तानने २ बाद ११२ अशी आश्वासक सुरुवात केली होती, परंतु त्याचा फायदा त्यांना घेतला आला नाही. मधल्या फळीने तर निराशा केलीच, परंतु तळाच्या फलंदाजांनीही कच खाल्ली. २ बाद ११२ वरून त्यांनी निम्मा संघ १२२ धावांत गमावला आणि त्यानंतर उरलेले पाच फलंदाज संघाच्या १५६ धावांवर गमावले.

संक्षिप्त धावफलक ः अफगाणिस्तान ः ३७.२ षटकांत सर्वबाद १५६ (रहमुल्ला गुरबाझ ४७, इब्राहिम झद्रान २२, अझमतुल्ला ओमझारी २२, शौरिफुल इस्लाम ३४-२, शकिब अल हसन ३०-३, मेहदी हसन २५-३) पराभूत वि. बांगलादेश ः ३४.४ षटकांत ४ बाद १५८ (मेहदी हसन ५७ , नजमुल हुसैन शांतो नाबाद ५९, फझलहक फारुकी १९-१, ओमझारी ९-१)

पुढच्या लढती ः

अफगाणिस्तान वि. भारत (११ ऑक्टोबर).

बांगलादेश वि. इंग्लंड (१० ऑक्टोबर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com