बार्सिलोना ‘कोपा डेल रे’ स्पर्धेत सलग चौथ्यांदा विजेता

वृत्तसंस्था
सोमवार, 23 एप्रिल 2018

माद्रिद - बार्सिलोनाने सेविलाचा ५-० असा धुव्वा उडवीत ‘कोपा डेल रे’ कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ला लीगा विजेतेपदही आवाक्‍यात असल्यामुळे बार्सिलोना या मोसमात स्पॅनिश फुटबॉलमध्ये दोन विजेतिपदे जिंकणार हे निश्‍चित असले, तरी ते चॅम्पियन्स लीग स्पर्धेतून बाद झाले आहेत. 

बार्सिलोनाने ही स्पर्धा एकंदर तिसाव्यांदा आणि सलग चौथ्यांदा जिंकली आहे. या विजेतेपदाने चॅम्पियन्स लीगमधील अपयशाचे दुःख नक्कीच कमी होणार नाही; पण मोसमाच्या सुरवातीस योजना तयार केली होती, त्या वेळी दोन स्पॅनिश विजेतेपदांची कल्पनाही सुखावणारी होती, असे लुईस सुआरेझने सांगितले. 

सुआरेझच्या दोन गोलना लिओनेल मेस्सीची तोलामोलाची साथ लाभली आणि बार्सिलोनाने लौकिकास साजेसा खेळ करीत अंतिम लढत एकतर्फी केली. सुआरेझने दोन गोल केले असले, तरी दुसऱ्या गोलात मेस्सीने रचलेल्या चालीचा वाटा जास्त मोलाचा होता. इनिएस्ता आणि कौटिन्हो यांनी उत्तरार्धात गोल करून बार्सिलोनाचा एकतर्फी विजय निश्‍चित केला.

ला लिगामध्ये दुसरे असलेल्या ॲटलेटिको माद्रिदला हरवून सेविलाने अंतिम फेरी गाठली होती. मात्र रोमाविरुद्धच्या चॅम्पियन्स लीगमधील एकतर्फी पराभवाने बार्सिलोना विजेतेपदासाठी जास्तच आतूर होते. त्यांनी चेंडूवर सहज वर्चस्व राखत विजय सुकर केला. 

मेस्सीचा गोल पंच
कोपा डेल रेच्या पाच अंतिम लढतीत गोल करण्याचा मेस्सीचा पराक्रम.
ही कामगिरी करणारा केवळ दुसरा खेळाडू. यापूर्वी १९४०-५० मध्ये तेल्मो झॅरा (ॲथलेटिक बिल्बाओ) याच्याकडून ही कामगिरी.
मेस्सीचे पाच अंतिम लढतीत सहा गोल; तर झॅरा यांचे आठ गोल.
सुआरेझचे बार्सिलोनाच्या पाच अंतिम लढतीत गोल.

Web Title: Barcelona winner in Copa del Rey championship