Barityatu Hockey School : खेडेगावातली शाळा बनली भारतीय महिला हॉकीची 'नर्सरी'; ऑलिम्पिकपटूंपासून कर्णधारांपर्यंत देशाची सेवा

Barityatu Hockey School, Nikki Pradhan: रांचीतील बरियातूची हॉकी नर्सरी; मैदानावरील मुलींना देशाच्या जर्सीचे स्वप्न दाखवणाऱ्या शाळेची गौरवशाली परंपरा
bariyatu school hockey.

bariyatu school hockey.

esakal

Updated on: 

मैदानावर हॉकीची स्टिक हातात घेतलेली मुलगी पुढे देशाची जर्सी घालून आंतरराष्ट्रीय मैदानावर उतरण्याचे स्वप्न पाहते. या स्वप्नाला गेल्या अनेक दशकांपासून दिशा देणारे ठिकाण म्हणजे रांचीतील बरियातू येथील सीएम स्कूल ऑफ एक्सलन्स (मुली). अभ्यासासोबतच महिला हॉकीपटू घडविण्याची परंपरा या शाळेने जपली असून, त्यामुळे तिची ओळख ‘महिला हॉकीपटूंची नर्सरी’ म्हणून निर्माण झाली आहे.

१९७२ मध्ये महिला प्रशिक्षण केंद्र म्हणून या उपक्रमाची सुरुवात झाली. १९७६ मध्ये त्याचा राष्ट्रीय क्रीडा गुणवत्ता स्पर्धा (NSTC) कार्यक्रमाशी संबंध आला. त्यानंतर या केंद्रातून अनेक खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com