World Cup 2019 : चौदा सामने झाल्यानंतरही धावांची सरासरी फक्त 5.7 

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जून 2019

स्पर्धेपूर्वी यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत पाचशेहून अधिक धावांचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, धावसंख्या चारशेच्या आकड्यालाही स्पर्श करू शकलेली नाही. विशेष म्हणजे पाचशे धावा होतील या पद्धतीने स्कोअरशीट तयार करण्यात आले होते. आतापर्यंत दहा सोडा संघ सहाची धावगतीही राखू शकलेले नाहीत. काय आहेत यंदांच्या स्पर्धेचे आतापर्यंतचे ट्रेंड :

वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्‍वकरंडक स्पर्धेला सुरवात होऊन दहा दिवस झाले आहेत. साखळीत 45 सामन्यांतील 14 सामने (13 पूर्ण, एक पावसामुळे रद्द) देखील झाले. थोडक्‍यात काय तार 25 टक्के विश्‍वकरंडक स्पर्धा पूर्ण झाली. स्पर्धेपूर्वी यंदाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेत पाचशेहून अधिक धावांचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, धावसंख्या चारशेच्या आकड्यालाही स्पर्श करू शकलेली नाही. विशेष म्हणजे पाचशे धावा होतील या पद्धतीने स्कोअरशीट तयार करण्यात आले होते. आतापर्यंत दहा सोडा संघ सहाची धावगतीही राखू शकलेले नाहीत. काय आहेत यंदांच्या स्पर्धेचे आतापर्यंतचे ट्रेंड :

- विजयाचे अंतर कमी: गेल्या सहा सामन्यांतील 3 सामन्यांत विजयाचे अंतर 21 धावांपेक्षा कमी. एक सामना तर दोन गडी राखून विजय 

-सरासरी धावगती घटली: आतापर्यंत दहा संघांच्या धावा बघितल्यातर स्पर्धेतील सरासरी धावगती 5.7. अर्थात अन्य विश्‍वकरंडक स्पर्धांपेक्षा अधिक. 2015च्या स्पर्धेत 5.63 सरासरीचा विक्रम 

-सीमारेषेवर झेल अधिक: सीमारेषेवर झेल होण्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. यासाठी संघ खास प्रयत्न आणि सराव करत आहेत. 

-प्रथम फलंदाजी घातक: भारताचा ऑस्ट्रेलियावरील विजय सोडल्यास प्रथम फलंदाजी करणे घातक ठरत आहे. आतापर्यंत सहा संघ प्रथम फलंदाजी करताना ऑलआऊट झाले आहेत. आव्हानाचा पाठलाग करताना दोन संघ ऑल आउट 

-चेंडूचा टप्पा पुढे : यंदाच्या स्पर्धेत गोलंदाज चेंडूचा टप्पा पुढे ठेवत आहेत. थोडक्‍यात, शॉर्ट पिच चेंडूंवर भर. यात विंडीज गोलंदाज आघाडीवर. आतापर्यंत 45 टक्के शॉर्ट पिच चेंडू टाकण्यात आले. साधारणपणे फलंदाजाच्या पुढे 8 मीटरवर टप्पा पडतोय. 

-चेंडूचा सरासरी वेग 132 कि.मी: आतापर्यंत गोलंदाजांचा चेंडू टाकण्याचा सरासरी वेग 132 कि.मी. प्रतितास. जोफ्रा आर्चरचा चेंडू आतापर्यंत वेगवान. स्लोअर वनचाही भरपूर उपयोग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Batting average is still very poor is world cup 2019