India Squad U19 Asia Cup 2023 : आशिया कपसाठी भारताच्या U-19 टीमची घोषणा! बीडच्या पठ्ठ्याला मिळाली संधी

BCCI announces India squad for ACC Men’s U19 Asia Cup 2023
BCCI announces India squad for ACC Men’s U19 Asia Cup 2023

BCCI announces India squad for ACC Men’s U19 Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-19 आशिया कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे या संघाची कमान सोपवण्यात आली आहे. तर नाशिकचा अर्शिन कुलकर्णीला आणि बीडच्या सचिन धसला संधी मिळाली आहे. दुबईच्या यजमानपदावर ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेला 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना रविवारी 17 डिसेंबर रोजी होणार आहे.

BCCI announces India squad for ACC Men’s U19 Asia Cup 2023
IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-20 होणार रद्द? तिरुवनंतपुरम मधील 'त्या' फोटोने वाढवले टेन्शन

भारतीय संघ अंडर-19 आशिया कपचा गतविजेता आहे. म्हणजेच याआधी गेल्या मोसमात भारताने विजेतेपद पटकावले होते. भारताचा अंडर-19 संघ हा स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. अंडर-19 भारतीय संघाने सर्वाधिक 8 ट्रॉफी आपल्या नावावर केल्या आहेत.

अंडर-19 आशिया कपसाठी भारताचा 15 सदस्यीय संघ -

अर्शिन कुलकर्णी, आदर्श सिंह, रुद्र पटेल, सचिन धस, प्रियांशू मोलिया, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), अरावेल्ली अवनीश राव, सौम्य कुमार, मुर्गन अभिषेक, इनेश महाजन, धनुष गौड, आराध्या शुक्ला, नमम तिवारी, राज लिंबानी.

राखीव खेळाडू - प्रेम देवकर, अंश गोसाई, मोहम्मद अमन

संघाबरोबर प्रवास न करणारे राखीव खेळाडू - दिग्विजय पाटील, जयंत गोयत, पी विग्नेश, किरण चोरमले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com