
गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांना भारतीय क्रिकेट संघाच्या घोषणेची उत्सुकता आहे. टीम इंडियाला पुढील महिन्यात इंग्लंडचा दौरा करायचा आहे. ते कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाच्या नवीन कर्णधाराची आणि संपूर्ण टीमची घोषणा होण्याची सर्वांना उत्सुकता आहे. पण फक्त पुरुष संघच नाही तर भारतीय महिला क्रिकेट संघही पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.