WTC Final : AUS vs RSA तिसरी कसोटी अनिर्णित; भारताच्या WTC फायनल खेळण्यावर झालाय परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WTC Final AUS vs RSA 3rd Test

WTC Final : AUS vs RSA तिसरी कसोटी अनिर्णित; भारताच्या WTC फायनल खेळण्यावर झालाय परिणाम

WTC Final AUS vs RSA 3rd Test : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला सामना अनिर्णित राखण्यात यश आले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 475 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 255 धावांवर संपला. ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेला फॉलोऑन देत दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्यांदा फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. आफ्रिकेने पाचव्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी 2 बाद 106 धावा केल्या. सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिका 2 - 0 जिंकली. मात्र या निकालाचा परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर झाला आहे.

हेही वाचा: Zimbabwe Cricket : झिम्बाब्वे क्रिकेट हादरलं! प्रशिक्षक असलेल्या पती - पत्नीचा महिन्याभरात गूढ मृत्यू

ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकल्यामुळे आधीपासूनच WTC गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने आपली जागा अधिक पक्की केली. ऑस्ट्रेलियाने मालिका 2 - 0 अशी जिंकली. मात्र त्यांना दक्षिण आफ्रिकेला क्लीन स्वीप देता आला नाही. यामुळे त्यांचे पॉईंट पर्सेंटेज हे 75.56 टक्क्यांपर्यंत घसरले. दक्षिण आफ्रिकेने तिसरा सिडनी कसोटी सामना अनिर्णित केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधील स्थान पक्के करण्यासाठी आता भारतासोबत भारतात होणाऱ्या कसोटी मालिकेपर्यंत थांबावे लागणार आहे.

मात्र सिडनी कसोटीनंतर भारताचे सलग दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वाढली आहे. भारतीय संघ सध्या 58.93 पॉईंट पर्सेंटेजवर आहे. तर श्रीलंका 53.33 टक्के पॉईंट पर्सेंटेज आहेत ते तिसऱ्या स्थानावर आहेत. (Sports Latest News)

हेही वाचा: Rahul Dravid On Suryalumar Yadav : सूर्यानं लहानपणी नक्कीच माझी बॅटिंग बघितली नाही... द्रविडने सूर्याची खेचली

ऑस्ट्रेलिया सारखे दक्षिण आफ्रिकेचे पॉईंट पर्सेंटेज देखील 48.72 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. ते सध्या चौथ्या स्थानावर आहेत. त्यांचे फायनलमध्ये पोहचण्याची आशा आता मायदेशात वेस्ट इंडीजविरूद्धच्या मालिकेवर टिकून आहे. मात्र आफ्रिकेची शक्यता ही इतर संघांच्यावरही अवलंबून आहे.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....