'चुकांचा लवकरात लवकर...' BCCI ने १२ लाखांचा दंड ठोठावल्यानंतर KKR चा कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला?

एक तर राजस्थानविरुद्धचा सामना गमावला आणि षटके निर्धारित वेळेत पूर्ण न केल्यामुळे १२ लाखांचा दंडही सहन करावा लागला.
bcci fine of 12 lakh to shreyas iyer kkr ipl 2024 cricket
bcci fine of 12 lakh to shreyas iyer kkr ipl 2024 cricket Sakal

कोलकता : कोलकता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला दुहेरी फटका बसला आहे. एक तर राजस्थानविरुद्धचा सामना गमावला आणि षटके निर्धारित वेळेत पूर्ण न केल्यामुळे १२ लाखांचा दंडही सहन करावा लागला.

यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरकडून निर्धारिक वेळेत २० षटके पूर्ण न केल्याचा प्रकार त्याच्याकडून प्रथमच झाल्यामुळे १२ लाखांचा दंड करण्यात आला; परंतु त्यापेक्षा अखेरच्या षटकांत बटलर सामन्यास कलाटणी देणारी खेळी करत असताना श्रेयस सीमारेषेवर पाचऐवजी चारच खेळाडू उभे करू शकला.

पॉवर प्लेच्या सहा षटकानंतर पाच क्षेत्ररक्षक सीमारेषेवर उभे करता येत असतात; पण निर्धारित वेळेत षटके पूर्ण होत नसतील, तेवढी षटके पाचऐवजी चारच क्षेत्ररक्षक सीमारेषेवर ठेवता येतात.

हा सामना जिंकण्याची आम्हाला चांगली संधी होती; पण अंतिम क्षणी काय घडले हे सांगणे कठीण आहे. हा पराभव स्वीकारून आम्हाला पुढे जायला हवे, असे श्रेयसने सामन्यानंतर सांगितले.

सुनील नारायण हा आमच्यासाठी बहुमोल खेळाडू आहे. प्रत्येक सामन्यात तो आपली उपयुक्तता सिद्ध करत आहे. फलंदाजीसह गोलंदाजीतही तो निर्णायक कामगिरी करत असे, अशा शब्दात श्रेयसने नारायणचे कौतुक केले.

राजस्थानविरुद्धच्या या सामन्यात झालेल्या चुकांचा अभ्यास करून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा लागणार असल्याचेही श्रेयस म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com