IPL 2020 : संघ अडचणीत आहे? बदली खेळाडूला खेळवा; BCCIचा नवा नियम

वृत्तसंस्था
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

- बीसीसीआयचा पॉवर प्लेअरचा नवा निर्णय
- यंदा अंतिम 11 ऐवजी अंतिम 15 खेळाडू
- संघाला गरज असेल तेव्हा हव्या त्या खेळाडूला मैदानात उतरवू शकेल. 

नवी दिल्ली : आयपीएल तयार करून क्रिकेट विश्‍वाला मोठी लीग देणाऱ्या भारतीय क्रिकेट मंडळ आता नवा बदल आयपीएलमध्ये करणार आहे. "पॉवर प्लेअर' असे त्याचे नाव असून बदली खेळाडूलाही खेळण्याची संधी मिळणार आहे. गरज असेल तेव्हा हा बदली खेळाडू येऊन सामन्याला कलाटणी देऊ शकेल. 

ट्वेंटी20 वर्ल्डकपमध्ये भारत-पाक नाही लढणार! वेळापत्रक जाहीर

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बदली खेळाडूचा नियम सध्या आयसीसीने सुरु केला आहे त्यामध्ये एखादा खेळाडू जखमी झाला आणि तो पुन्हा सहभागी होऊ शकणार नसेल तर त्याच्या ठिकाणी बदली खेळाडूला खेळण्याची संधी मिळते. आयपीएलमध्ये संघाला गरज असले तेव्हा संघ आवश्‍यक असेल त्या खेळाडूला मैदानात उतरवू शकेल. 

सामना सुरु होण्यापूर्वी अंतिम 11 खेळाडू जाहीर केले जातात पण यंदा आयपीएलमध्ये अंतिम 15 खेळाडू जाहीर केले जातील. यातील 11 खेळाडू मैदानात उतरतील पण आवश्‍यकता भासेल तेव्हा संघाचा कर्णधार उरलेल्या खेळाडूतील कोणालाही मैदानात आणू शकेल. या बाबतचा अंतिम निर्णय आयपीएल प्रशासकीय समिकीच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात येऊ शकेल. 

आम्ही विसरलोच मुशफिकूर बुटका आहे : रोहित शर्मा

हा बदली खेळाडू एखादा फलंदाज बाद झाल्यावर किंवा षटक पूर्ण झाल्यावर मैदानात येईल. आयपीएलपासून या नियमाची अंमलबजावणी करण्याचा विचार असला तरी काही दिवसांत मुंबईत सुरु होणाऱ्या मुश्‍ताक अली राष्ट्रीय ट्‌वेन्टी-20 स्पर्धेत हा प्रयोग आम्ही करण्याचा विचार करत आहोत, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. 

या बदलाचा कसा परिणाम होईल आचे उदाहण देताना या पदाधिकाऱ्याने सांगितले, समजा अखेरचे षटक सुरु होत आहे आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे आणि त्यावेळी आंद्रे रसेलसारखा फलंदाज डगआऊटमध्ये राखीव खेळाडू म्हणून बसलेला असेल तर त्यावेळी त्याला फलंदाजीस आणले जाऊ शकेल. त्याप्रमाणे अखेर षटक आणि सहा धावा असे समिकरण असेल आणि जसप्रित बुमरासारखा गोलंदाज राखीव म्हणून डगआऊटमध्ये असेल तर तो मैदानात येऊन हे षटक टाकू शकेल. आयपीएल अधिक रंगतदार करण्याचा या मागचा हेतू आहे, असे हा पदाधिकारी म्हणाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI to implement new Power Player rule in IPL 2020