BCCI New President Mithun Manhas
esakal
Who is Mithun Manhas? : गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयचा नवा अध्यक्ष कोण होणार, याची चर्चा सुरु होती. अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू मिथुन मनहास यांच्यासह अनेक नावं नाव चर्चेत होती. मात्र, आज मिथून मनहास यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. रॉजर बिन्नींनंतर मिथुन मनहास हे बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून काम बघणार आहेत. त्यामुळे बीसीसीआयला आज नवा बॉस मिळाला आहे.