BCCI चा मोठा निर्णय! PayTM ची सुट्टी, Mastercard टीम इंडियाचा नवा टायटल स्पॉन्सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mastercard BCCI New Title Sponsor

PayTM ची सुट्टी, Mastercard टीम इंडियाचा नवा टायटल स्पॉन्सर

Mastercard BCCI New Title Sponsor : भारतीय संघ देशात कोणतीही मालिका खेळेल, तिच्या प्रायोजकत्वावर PayTM जाहिरात नसणार आहे. डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने BCCI सोबतचा करार वेळेआधीच तोडला आहे. आता बीसीसीआयने टायटल स्पॉन्सर PayTM ची जागा Mastercard ने घेतली आहे. आता भारतात होणाऱ्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे टायटल स्पॉन्सर फक्त मास्टरकार्ड असेल.

BCCI ने 2019 मध्ये पेटीएम सोबत टायटस प्रायोजकत्व चार वर्षांसाठी वाढवले होते, त्यानंतर एका सामन्यासाठी 3.80 कोटी रुपयांचा सौदा निश्चित करण्यात आला, त्यापूर्वी ही रक्कम 2.4 कोटी रुपये होती, परंतु 2022 मध्येच पेटीएमने हा करार तोडला.

हेही वाचा: Video: कॅरेबियन मोहिम फत्ते करण्यासाठी हिटमॅन रोहित पंतसोबत दाखल

भारतीय संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय संघ वेस्ट इंडिजचा दौरा संपवून झिम्बाब्वेला जाणार आहे. येथे टीम इंडिया 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. देशांतर्गत दौऱ्यावर मास्टरकार्डच शीर्षक प्रायोजक असेल.

इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, पेटीएमने जुलैच्या सुरुवातीला बीसीसीआयला सांगितले होते की, यापुढे त्यांच्या सामन्यांचे शीर्षक प्रायोजक म्हणून चालू ठेवू इच्छित नाहीत आणि त्यांनी मास्टरकार्डकडे अधिकार सोपवण्यास सांगितले होते. अशा परिस्थितीत बीसीसीआयने पेटीएमसोबत झालेल्या कराराच्या आधारे हे अधिकार मास्टरकार्डकडे हस्तांतरित केले. आता मास्टरकार्ड बीसीसीआयला प्रति सामन्यासाठी 3.8 कोटी रुपये देणार आहे.

पेटीएमने यापूर्वी 2023 पर्यंत बीसीसीआयकडून हे हक्क विकत घेतले होते. मात्र आता ते वेगळे झाले असून आता 2023 पर्यंत हे अधिकार मास्टरकार्डकडे सुपूर्द केले जातील. 2019 मध्ये, पेटीएमने प्रति सामना 326.80 कोटी रुपयांचा हा करार केला होता.

Web Title: Bcci New Title Sponsor Mastercard Replaces Paytm As International Domestic Cricket In India

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BCCI