Video: कॅरेबियन मोहिम फत्ते करण्यासाठी हिटमॅन रोहित पंतसोबत दाखल

हिटमॅन रोहित पंतसोबत कैरिबियन बेटावर झाला दाखल, VIDEO
rohit sharma rishabh pant share pics alongside dinesh karthik
rohit sharma rishabh pant share pics alongside dinesh karthiksakal

India vs West Indies : भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची एकदिवसीय मालिका 2-0 जिंकली आहे. सध्या एक वनडे सामना बाकी आहे जो बुधवारी खेळवला जाणार आहे. भारतीय संघ यानंतर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ज्यासाठी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया त्रिनिदादला पोहोचला आहे. बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे

रोहित, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. रोहित आणि पंत टी-20 स्पेशालिस्ट दिनेश कार्तिकसह वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी दाखल झाले आहेत. कोहली आणि बुमराहला संपूर्ण दौऱ्यावर विश्रांती देण्यात आली आहे.

rohit sharma rishabh pant share pics alongside dinesh karthik
Axar Patel चे कौतुक करणारे Rohit Sharma चे गुजराती ट्विट व्हायरल

रोहित आणि पंत या दोघांनी त्रिनिदादमध्ये आल्याचे फोटो शेअर केले आहेत. पंतने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर "हॅलो त्रिनिदाद" म्हणत विमानातील एक फोटो शेअर केला आहे, तर रोहितने विमानतळावरील एक फोटो शेअर केला आहे. भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, हर्षल पटेल, रविचंद्रन अश्विन आणि हार्दिक पांड्या हे देखील वेस्ट इंडिजला दाखल झाले आहे.

ऋषभ पंतसाठी वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका खूप महत्त्वाची आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन टी-20 सामन्यांमध्ये त्याला केवळ 26 धावा करता आल्या. पंतला वेस्ट इंडिज मालिकेत स्वत:ला सिद्ध करावे लागेल कारण टी-20 मधील त्याचे स्थान धोक्यात आहे. दिनेश कार्तिकनेही यष्टिरक्षक म्हणून संघात प्रवेश केला असून इतर खेळाडू मधल्या फळीत चांगली कामगिरी करत आहेत.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-20 सामना 29 जुलै रोजी त्रिनिदाद येथे होणार आहे. यानंतर दुसरा टी-२० सामना 1 ऑगस्टला सेंट किट्स, तिसरा टी-20 सामना 2 ऑगस्टला खेळवला जाईल. या मैदानावर चौथा टी-20 सामना 6 ऑगस्ट रोजी अमेरिकेतील लॉंडरहिल येथे आणि पाचवा टी-20 सामना 7 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com