होय... IPL स्पर्धा आता भारतातच होणार : जय शाह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ipl
होय... IPL स्पर्धा आता भारतातच होणार : जय शाह

होय... IPL स्पर्धा आता भारतातच होणार : जय शाह

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामातील स्पर्धा ही भारतातच पार पडणार आहे. भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी याची पुष्टी केली आहे. चेन्नई सुपर किंग्जच्यावतीने चेन्नईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते उपस्थितीत होते. यावेळी त्यांनी लवकरच चेपॉकच्या मैदानात चेन्नईच्या संघाला खेळताना दिसेल, असे म्हटले आहे.

कार्यक्रमात बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले की, 'तुम्ही सर्व चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला पुन्हा एकदा चेपॉकच्या मैदानात खेळताना पाहायला उत्सुक आहात, याची कल्पना आहे. लवकरच तुम्ही चेन्नईच्या मैदानात पुन्हा तुमच्या सघांला खेळताना पाहू शकाल. ते पुढे म्हणाले, 'आयपीएलच्या 15 व्या हंगामातील स्पर्धा ही भारतातच होईल. दोन नवीन संघाच्या समावेशाने या स्पर्धेतील रंगत आणखी वाढेल. आगामी स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. यावेळी आपल्याला नवीन समीकरणाची अनुभूतीही येईल.

हेही वाचा: Video : रडवा आफ्रिदी! सिक्सर हाणल्यावर बॉल फेकून मारला अन् मग...

कोरोनाच्या संकटामुळे 2020 मध्ये झालेली 13 व्या हंगामातील संपूर्ण स्पर्धा युएईच्या मैदानात खेळवण्यात आली होती. 2021 च्या 14 व्या हंगामात स्पर्धेची सुरुवात भारतात झाली खरी पण काही संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली. स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सर्व सामने पुन्हा एकदा युएईच्या मैदानात खेळवण्यात आले. एवढेच नाही तर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धाही भारतातून युएईत स्थलांतरित करण्यात आली होती.

हेही वाचा: दर्शनची हॅटट्रिक व्यर्थ, विदर्भाला नमवत कर्नाटक फायनलमध्ये

आयपीएलच्या आगामी हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ खेळताना दिसणार आहेत. याशिवाय मेगा लिलावाच्या माध्यमातून इतर संघातही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सध्याच्या आठ संघांना प्रत्येकी चार खेळाडू रिटेन करता येणार आहे. यात किमान दोन देशातील खेळाडू आणि परदेशातील 2 खेळाडूंना फ्रेंचायझी रिटेन करु शकतात. नवे दोन संघ मेगा लिलावात तीन खेळाडूंवर बोली लावू शकते.

loading image
go to top