Video : रडवा आफ्रिदी! सिक्सर हाणल्यावर बॉल फेकून मारला अन् मग... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shaheen afridi
Video : रडवा आफ्रिदी! सिक्सर हाणल्यावर बॉल फेकून मारला अन् मग...

Video : रडवा आफ्रिदी! सिक्सर हाणल्यावर बॉल फेकून मारला अन् मग...

sakal_logo
By
सुशांत जाधव

Pak Vs Ban, Shaheen Afridi: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील साखळी सामन्यात दमदार कामगिरीनंतर पाकिस्तानच्या संघाला सेमी फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला सेमी फायनलपर्यंत पोहचवण्यात ज्या शाहीन शाह आफ्रिदीने (Shaheen Afridi) मोलाचा वाटा उचलला तोच सेमीफायनलमध्ये नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरला. मोक्याच्या क्षणी त्याने कर्णधाराचा विश्वासघात केला. वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या चुका विसरुन पाकिस्तानचा संघ आता बांगलादेश दौऱ्यावर पोहचला आहे.

बांगलादेश विरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील विजयासह पाकिस्तान संघाने मालिका खिशात घातली. दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानचा प्रमुख जलदगती गोलंदाज भान विसरल्याचे पाहायला मिळाले. शाहीन आफ्रिदीने एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. बांगलादेशच्या फलंदाजाला त्याने चक्क रागाने चेंडू फेकून मारल्याचा प्रकार घडला. हे कृत्य केल्यानंतर त्याने माफी मागितली असली तरी त्याची अखिलाडूवृत्ती माफी लायक निश्चितच नाही.

हेही वाचा: PAK vs BAN : टीम इंडियापाठोपाठ पाकिस्तानने 2-0 अशी जिंकली मालिका

शाहीन शाह आफ्रिदीने केलेल्या चिडखोर आणि अखिलाडूवृत्तीच्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकजण त्याला ट्रोल करताना दिसते. ढाकाच्या मैदानात बांगलादेशने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशच्या डावातील तिसऱ्या षटकात शाहीन शाह आफ्रिदी गोलंदाजी करत होता. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अफिफ हुसैन याने उत्तुंग षटकार मारला.

हेही वाचा: दर्शनची हॅटट्रिक व्यर्थ, विदर्भाला नमवत कर्नाटक फायनलमध्ये

तिसऱ्या चेंडूवर अफिफने मारलेला चेंडू सरळ आफ्रिदीच्या हातात गेला. यावेळी त्याने काही क्षणात चेंडू पकडत अफिफ हुसैनच्या दिशेने फेकून मारला. हा चेंडू अफिफच्या पायवर आदळला. तो जमीनीवर कोसळलाही. हा सर्व प्रकार झाल्यानंतर त्याने माफीही मागितल्याचे दिसले. त्याने माफी मागितली असली तरी रागाच्या भरात त्याने ही कृती केल्याच दिसत होते. आफ्रिदीने या सामन्यात आपल्या 4 षटकांच्या कोट्यात 15 धावा खर्च करुन 2 विकेट घेतल्या. तर अफिफ हुसैन याने 20 धावांची खेळी केली.

loading image
go to top