BCCI Umpire Salary Stagnant for 7 Years
esakal
आंतरराष्ट्रीय संघ असो किंवा देशांतर्गत क्रिकेटपटू, महिला असो की पुरुष बीसीसीआयने सर्व खेळाडूंच्या मानधनात मोठी वाढ केली आहे. अनेकांनी त्याचं कौतुकदेखील केलं आहे. मात्र, बीसीसीआयसाठी काम करणारे अंपायर या लाभागापासून वंचित आहेत. गेल्या सात वर्षांत त्यांच्या मानधनात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. यासंदर्भातील एक रिपोर्ट समोर आला असून यासंदर्भात विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत.