ICC World Cup BCCI : वर्ल्डकपसाठी कोणत्या स्टेडियमचे तिकीट काढायचं... बीसीसीआय 'या' तारखेला सांगणार | Cricket News In Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BCCI SGM Jay Shah

ICC World Cup BCCI : वर्ल्डकपसाठी कोणत्या स्टेडियमचे तिकीट काढायचं... बीसीसीआय 'या' तारखेला सांगणार

ICC World Cup 2023 BCCI : आयपीएल 2023 ची फायनल उद्या 28 मे रोजी होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला बीसीसीआयची अहमदाबादमध्ये सर्वसाधारण सभा होत आहे. बीसीसीआयचे उच्च अधिकारी या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. यात आशिया कप 2023 आणि वर्ल्डकप 2023 चे ठिकाण निश्चित करणे हे महत्वाचे मद्दे देखील आहे. बीसीसीआयच्या या बैठकीत माध्यम हक्काबाबत देखील चर्चा होईल. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि अध्यक्ष रॉजर बिन्नी दोघेही अहमादाबादमध्ये पोहचले आहेत.

बीसीसीआय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. जरी या बैठकीमध्ये आशिया कपचा मुद्दा समाविष्ट नसला तरी याबाबत एका निर्णयाप्रत पोहचण्याचा प्रयत्न केला जाईल. वर्ल्डकप हा देखील महत्वाचा मुद्दा असून वर्ल्डकपसाठी आता फार कमी वेळ शिल्लक आहे. आता स्टेडियम निश्चित करावे लागतील. त्यानंतर कामाला लवकरच सुरूवात होईल.'

बीसीसीआय SGM मधील पाच मुद्दे

- विकास आणि अनुदान समितीची स्थापना करणे.

- राज्य संघटनांसाठी फिजिओथेरपिस्ट आणि ट्रेनर यांच्या नियुक्तीबाबत मार्गदर्शक तत्वे तयार करणे.

- आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 साठी कार्यकारी ग्रुप तयार करणे.

- वुमन्स प्रीमियर लीग समितीची स्थापना करणे

- लैंगिक शोषण विरोधी पॉलिसीमधील त्रुटी शोधणे.

(Sports Latest News)