"मी आई बनू शकत नाही"; क्रिकेटरच्या पत्नीची भावनिक पोस्ट

क्रिकेटर बेन कटिंगची पत्नी एरिन हॉलैंडने तिचे दुःखद कहाणी शेअर केली आहे.
Ben Cutting Australian cricketer wife erin holland
Ben Cutting Australian cricketer wife erin hollandSAKAL

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर बेन कटिंगची पत्नी आणि टीव्ही प्रेझेंटर एरिन हॉलैंडने तिचे दुःखद कहाणी शेअर केली आहे. एरिनने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये तिने सांगितले की, मी कधी आई होऊ शकणार नाही याचे मला दुःख आहे. जेव्हा मी बेनचा विचार करते तेव्हा स्वतःला अपयशी समजते. एरिन हॉलैंडने शेअर केलेला हा किस्सा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Australian Cricketer Ben Cutting Wife Erin Holland)

Ben Cutting Australian cricketer wife erin holland
मॅचदरम्यान मुलीनं RCB चाहत्याला केलं प्रपोज; नेटकरी म्हणाले, IPL पाहिला आलोय...

एरिन हॉलंडनेही इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केली आहेत, ज्यामध्ये तिने शस्त्रक्रियेपूर्वी आणि नंतरची स्थिती दाखवली आहे. एरिनने तिच्या फोटोच्या मेसेजमध्ये लिहिले की, गेल्या वर्षी समजले की आम्हाला मूल होऊ शकत. आता केवळ IVF च्या मदतीने मूल होऊ शकते. हे माझ्यासाठी बेनला निराश करण्यासारख आहे. आम्हाला कळले की आमच्या पहिल्या IVF चाचणीचा निकाल अयशस्वी आला आहे, परंतु सध्याच्या मेडिकलमुळे अनेक गोष्टी सुधारण्याची शक्यता आहे. मूल होण्याच्या प्रक्रियेत अनेक गोष्टी घडत असतात, पण त्याची काळजी आपल्याला घ्यावीच लागते.

Ben Cutting Australian cricketer wife erin holland
मुकेश चौधरीच्या 'त्या' थ्रोमुळे विराटचे चाहते संतापले - पाहा व्हिडिओ

एरिन होलैंड अलीकडेच पाकिस्तान सुपर लीगमध्ये दिसली होती. सुपर लीगमध्ये त्यांनी अँकरिंगची जबाबदारी घेतली होती. बेन कटिंग हा देखील पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी झाला होता. बेन कटिंगने ऑस्ट्रेलियासाठी फक्त 4 वनडे आणि 7 टी-20 सामने खेळले आहेत. तो वेगवेगळ्या T20 लीगमध्ये भाग घेत असतो. बाहेर लीगमध्ये त्यानी सुमारे 200 सामने खेळले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com