
बारबाडोसमध्ये इंग्लंडच्या बेन स्टोक्सची 'विक्रमी' धुळवड
इंग्लंड आणि वेस्ट इंडीज (West Indies vs England) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सने (Ben Stokes) विक्रमाची धुळवड साजरी केली. त्याने विंडीजच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत दमदार शतक ठोकले. बेन स्टोक्सचे हे शतक विक्रमी (Ben Stokes Records) ठरले. इंग्लंडने वेस्ट इंडीजविरूद्ध पहिल्या डावात 507 धावा केल्या आहेत. त्याच्या प्रत्युतरात खेळताना वेस्ट इंडीजने दुसऱ्या दिवसअखेर 1 बाद 71 धावा केल्या.
हेही वाचा: VIDEO: मुंबईकर सचिनच्या पिचकारीतून उडाला CSKचा रंग
बेन स्टोक्सने तडाखेबाज फलंदाजी करत 128 चेंडूत शतकी खेळी साकारली. या शतकी खेळीत त्याने 11 चौकार आणि 6 षटकार ठोकले. बेन स्टोक्स बरोबरच इंग्लंडचा कर्णधार जो रूटने (Joe Root) देखील दमदार शतकी खेळी केली. या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावरच इंग्लंडने आपला पहिला डाव 507 धावांवर घोषित केला. रूटने 153 धावांची खेळी केली.
हेही वाचा: VIDEO: रोहित शर्मा होळीच्या शुभेच्छा देताना रितिका वैतागली
स्टोक्स ठरला 5000 मनसबदार
वेस्ट इंडीजविरूद्धच्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी लंचनंतर कर्णधार जो रूट बाद झाला. त्यानंतर बेअरस्टो देखील 20 धावांची भर घालून माघारी परतला. यानंतर बेन स्टोक्सने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. विशेष म्हणजे स्टोक्सने षटकार खेचत आपल्या कसोटीमधील 5000 धावा पूर्ण केल्या. या 5000 हजार धावा पूर्ण करणाऱ्या षटकाराबरोबर स्टोक्स कसोटीत 150 पेक्षा जास्त विकेट आणि 5000 धावा करणारा फक्त 5 वा अष्टपैलू खेळाडू ठरला. तर अशी कामगिरी करणारा स्टोक्स हा इंग्लंडचा दुसरा अष्टपैलू खेळाडू आहे.
Web Title: Ben Stokes Became 5th Test Player Who Complete 5000 Runs And More Than 150 Wickets
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..